आमिरच्या दंगल मध्ये गिरीश कुलकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2016 09:09 AM2016-02-05T09:09:21+5:302016-02-05T14:42:22+5:30

   हितेश तिवारी  दिग्दर्शित दंगल या चित्रपटात आमिर खान सोबत आपला मराठी बाणा असलेला अभिनेता गिरीश कुलकर्णीदेखील झळकणार आहे.  

Girish Kulkarni in Aamir's riot | आमिरच्या दंगल मध्ये गिरीश कुलकर्णी

आमिरच्या दंगल मध्ये गिरीश कुलकर्णी

Next
लिवुड चित्रपटात मराठी कलाकारांनी काम करणे हे नेहमीच कौतुकाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर बॉलिवुडमध्ये एखादया मराठी कलाकाराला बिग बजेट चित्रपट व त्याचबरोबर सुपर क्साट आमिर खानसोबत काम करणे म्हणजे दुधात दुग्दशर्कराच म्हणावे लागेल. पण आता, तुम्ही विचारात पडला असेल इतका आनंदाचा क्षण कोणच्याबाबतीत घडला आहे. तर ऐका, हितेश तिवारी  दिग्दर्शित दंगल या चित्रपटात आमिर खान सोबत आपला मराठी बाणा असलेला अभिनेता गिरीश कुलकर्णीदेखील झळकणार आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सने बोलताना गिरीश म्हणाला, हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. आमिर खान सोबत काम करताना खूप काही शिकायला मिळाले. यातून मिळणारा प्रत्येक अनुभव शिकविणारा होता. तसेच दंगल मध्ये काम करणे ही माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. चला, तर आपल्या या मराठी कलाकाराला दंगल चित्रपटासाठी शुभेच्छा देउयात तसेच या चित्रपटात गिरीश कोणत्या भूमिकेत मात्र दिसणार आहे हे गुलदस्त्यातच.

Web Title: Girish Kulkarni in Aamir's riot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.