महाआरोग्य शिबिरासाठी मुख्यमंत्री ९ रोजी शहरात गिरीश महाजन यांचा पुढाकार: दिग्गज डॉक्टरांसह प्रमुख मंत्र्यांची उपस्थिती
By admin | Published: December 23, 2015 12:18 AM2015-12-23T00:18:32+5:302015-12-23T00:18:32+5:30
जळगाव : आरोग्य सेवा क्षेत्रात लौकिक मिळविलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून येत्या ९ ते १२ जानेवारी या कालावधित महाआरोेग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आरोग्य क्षेत्रात लौकिक प्राप्त डॉक्टरांची या शिबिरास उपस्थिती लाभणार आहे. या शिबिराचे उद्घाटन ९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून राज्याच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांची या सोहळ्यास उपस्थिती लाभणार आहे.
Next
ज गाव : आरोग्य सेवा क्षेत्रात लौकिक मिळविलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून येत्या ९ ते १२ जानेवारी या कालावधित महाआरोेग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आरोग्य क्षेत्रात लौकिक प्राप्त डॉक्टरांची या शिबिरास उपस्थिती लाभणार आहे. या शिबिराचे उद्घाटन ९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून राज्याच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांची या सोहळ्यास उपस्थिती लाभणार आहे. जिल्ातील गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात सतत पुढाकार असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून नववर्षात ९ ते १२ या कालावधित महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यांची लाभणार उपस्थितीया शिबिरासाठी जगविख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. भाचार्य, डॉ.अमित मानदेव, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. उधाणी, डॉ. कीर्तने, डॉ.देवपुजारी, डॉ. बिडवे, डॉ. प्रधान, डॉ.आंबर्डेकर, डॉ. नागदा, डॉ. मानसिंग पवार, डॉ. संचेती, डॉ. हार्डिकर, मुंबईती नायर हॉस्पिटलचे डिन डॉ. भारमल, डॉ. सुलेमान मर्चंट, डॉ. चौरसिया यांच्यासह अनेक तज्ज्ञांची उपस्थिती लाभणार आहे. जळगाव शहरातील जी.एस.मैदानावर या डॉक्टर्सचा चार दिवस मुक्काम असेल. विविध व्याधींवर तपासणी व उपचार हे डॉक्टर्स करतील. प्रमुख मंत्र्यांची हजेरीया शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, महसूल मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री दीपक सावंत, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बाबट आदींची उपस्थिती असेल. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे चारही दिवस शिबिर स्थळी हजेरी लावणार आहेत. या शिबिराच्या पूर्वतयारीसाठी येत्या २७ रोजी काही तज्ज्ञ डॉक्टर्सची एक बैठक जळगाव येथे आयोजिण्यात आली असल्याचे रामेश्वर नाईक यांनी सांगितले.