धक्कादायक! उशीजवळ चार्जिंगला लावलेल्या फोनमध्ये स्फोट, झोपेतच मुलीचा मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 04:34 PM2019-10-01T16:34:29+5:302019-10-01T16:41:11+5:30
टेक्नॉलॉजीने आज मनुष्यांवर जणू एक जादूच केली आहे. खासकरून स्मार्टफोनशिवाय तर लोकांचं जगणंच कठीण झालं आहे.
(Image Credit : nzherald.co.nz)
टेक्नॉलॉजीने आज मनुष्यांवर जणू एक जादूच केली आहे. खासकरून स्मार्टफोनशिवाय तर लोकांचं जगणंच कठीण झालं आहे. स्मार्टफोन गॅजेट कमी आणि आपल्या शरीराचा अंग जास्त झाला आहे. याचे काही चांगले फायदे आहेत, तर काही तोटे आहेत. अनेकदा स्मार्टफोन लोकांसाठी जीवघेणा ठरत आहे. कझाकिस्तानच्या बास्तोबमधील घटना आहे. एक १४ वर्षांची मुलगी तिचा फोन बेडजवळ चार्जिंगला लावून झोपली. फोन फुटला आणि यात तिचा झोपेतच मृत्यू झाला.
NzHerald च्या रिपोर्ट्नुसार, १४ वर्षाच्या मुलीचं नाव आलुआ सित्स्कीजी अब्जलबेक असं आहे. ती झोपण्यापूर्वी फोनवर गाणी ऐकत होती. तिने फोन उशीवर ठेवला आणि तशीच झोपली. फोनचं चार्जिंग सुरूच होतं. फोन अधिक गरम झाल्यामुळे त्यात स्फोट झाला. सकाळी तिचा मृतदेह घरातील लोकांनी बेडवर आढळला.
(Image Credit : thesun.co.uk)
डॉक्टरांनुसार, फोनच्या स्फोटामुळे मुलीच्या डोक्याला फार गंभीर जखमा झाल्या आहेत. अंदाज व्यक्त केला जात आहे की, यामुळेच तिचा मृत्यू झाला. पोलीस याबाबत आणखी चौकशी करत आहे. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, फोन ओव्हरहिट झाला होता. याच कारणाने त्यात स्फोट झाला. चौकशी अधिकाऱ्यांनी फोनच्या कंपनीचं नाव जाहीर केलं नाही.