'या' तरूणीचं शरीर काही मिनिटातच आंघोळ केल्यासारखं भीजतं, वापरावं लागतं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 12:05 PM2019-02-12T12:05:20+5:302019-02-12T12:11:35+5:30
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय एका तरूणीचं शरीर आपोआप काही वेळात इतकं भीजतं की, कुणी तिच्यावर पाणी फेकलं की काय असं वाटतं.
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय एका तरूणीचं शरीर आपोआप काही वेळात इतकं भीजतं की, कुणी तिच्यावर पाणी फेकावं. त्यामुळे स्वत:ला कोरडं ठेवण्यासाठी तिला सोबत इलेक्ट्रॉनिक ड्रायर ठेवावं लागतं. या तरूणीचं नाव सोफी ड्वेर असून ती एक विद्यार्थीनी आहे.
खरंतर सोफीला एक आजार आहे आणि या आजारामुळे सामान्य व्यक्तीपेक्षा तिला १० पटीने जास्त घाम येतो. या समस्येमुळे तिचं जगणं जरा फारच त्रासदायक झालं आहे. मुळात जिवंत राहण्यासाठी दिवसातून साधारण ६ लिटर पाणी प्यावं लागतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोफी जेव्हा या समस्येने हैराण झाली होती, तेव्हा तिचे आई-वडील तिला डॉक्टरकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी सांगितले की, सोफीला हायपरडायड्रोसिस नावाचा आजारा आहे. हा असा आजार आहे, जो प्रत्येक २०० व्यक्तीतील एकाला प्रभावित करते.
हायपरहायड्रोसिस आजारात व्यक्तीच्या शरीरातून फार जास्त घाम येतो. असं वाटतं की, ती व्यक्ती आत्ताच आंघोळ करून बाहेर आली आहे. सोफीसोबतही असंच होतं. तिचे कपडे फार लवकर भीजतात, त्यामुळे दिवभरातून अनेकदा तिला कपडे बदलावे लागतात.
सोफी यावर सांगते की, 'सतत कपडे भीजत असल्याने मला लोकांमध्ये जाण्यास अडचण येते. इतकेच नाही तर या आजारामुळे माझा बॉयफ्रेन्डही मला सोडून गेलाय. आता मला कुणाशी डेट करायलाही भीती वाटते'.
सोफी सांगते की, हिवाळ्यात तिला या समस्येची फार जास्त अडचण होते. कारण थंडीच्या दिवसात ती गरम कपडे परिधान करून असते. पण घाम तिच्या शरीराला थंड करतो. घामामुळे कपडे इतके भिजतात की, बाहेर येतात ते शरीराला चिकटायला लागतात.
सोफीने पुढे सांगतिले की, आता ती जेव्हाही बाहेर येते तेव्हा तिला सोबत हेअर ड्रायर घेऊन जावं लागतं. बाहेर आल्यावर तिला घाम आला की, ती या हेअर ड्रायरने स्वत:ला हवा घेऊन घाम दूर करते.