मुलींनो, आत्मनिर्भर व्हा -अक्षय कुमार !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2017 06:35 PM2017-01-11T18:35:33+5:302017-01-11T18:41:20+5:30
काहींच्या मते मुलींचे तोटे कपडे आणि वर्तन त्यांच्या छेडछाडीला कारणीभूत ठरते. त्यांच्या वर्तनामुळे मुलांमध्ये काही भावना उत्त्पन्न होतात. २१ व्या शतकात आणि विकसनशील देशात आजही अशाच प्रकारचे विचार केले जात असल्याने अनेकांकडून या गोष्टीचा निषेध केला जात आहे. अशापैकी एक नाव म्हणजे अभिनेता अक्षय कुमार.
Next
काहींच्या मते मुलींचे तोटे कपडे आणि वर्तन त्यांच्या छेडछाडीला कारणीभूत ठरते. त्यांच्या वर्तनामुळे मुलांमध्ये काही भावना उत्त्पन्न होतात. २१ व्या शतकात आणि विकसनशील देशात आजही अशाच प्रकारचे विचार केले जात असल्याने अनेकांकडून या गोष्टीचा निषेध केला जात आहे. अशापैकी एक नाव म्हणजे अभिनेता अक्षय कुमार.
अक्षय कुमारने सोशल मिडीयावर एका व्हिडीयोच्या माध्यमातून आपल्या मनातील संताप व्यक्त केला आहे. अक्षयच्या मते, रात्री-अपरात्री मुलीची छेडछाड करणारे काही पुरूष आपल्या समाजातीलच एक भाग असल्याची लाज वाटते. अशाप्रकारचे कृत्य निंदनीय आहे. यावेळी अक्षय कुमारने मुलींना स्वावलंबी होण्याचा सल्ला दिला आहे. स्त्री म्हणजे कमजोर आणि पुरूष बलवान हा समज दूर करा. तुमची कोठेही छेडछाड झाल्यास त्याला पलटून प्रतिकार करा. सहनशील न बनता मार्शल आर्टचे शिक्षण घ्या. अनेक लहान लहान ट्रिक्स वापरून प्रत्येक स्त्रीला स्वत:चे रक्षण करणे अगदीच शक्य आहे. मात्र त्यासाठी प्रत्येकीने सक्षम होणं गरजेचे आहे.
सातच्या आत घरात हे नियम दूर करून आजकाल मुलीदेखील शिफ्ट्समध्ये काम करतात. अशावेळी रात्री-अपरात्री बाहेर फिरतात. एकट्या-दुकट्या मुलींना पाहून रस्त्यावरील रोडरोमियो अश्लील भाषेत टीप्पणी करतात, त्रास देतात, छेडछाड करतात.
त्यावेळी आत्मसंरक्षणसाठी प्रतिकार करून त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी या काही गोष्टी स्वत:जवळ ठेवा.
तिखट पाण्याचा स्प्रे - काळामिरी किंवा तिखट पाण्यात मिसळून तयार केलेले पाणी स्प्रेच्या बाटलीमध्ये भरा. त्या पाण्याचा फवारा थेट डोळ्यात मारल्यास तुम्हांला तेथून सटकायला मदत होईल.
छत्री - गर्दीच्या ठिकाणी मुद्दामून धक्का मारल्याचा अनुभव अनेकींना रेल्वे स्थानकावर येतो. अशावेळी छत्री जवळ असल्यास त्याचा वापर मारण्यासाठी करू शकता.
डिओ - पेपर स्प्रे जवळ नसल्यास तुम्ही डिओची बाटली जवळ असल्यास त्याचा वापर करू शकता. थेट डोळ्यात त्याचा फवारा मारा.
मांडीचा सांधा - पोटाच्या खाली आणि मांड्यांच्या वरच्या बाजूला थेट हल्ला करू शकलात तर तीव्र वेदना होतील हे नक्की. यावेळात समोरील व्यक्ती कमजोर होते आणि तुम्हांला पळायला, लपायला वेळ मिळू शकतो.
पाय - जर तुम्ही त्याच्या ताब्यात असाल तर पोर्ट्यांवर हल्ला करून किंवा टाच जोरात पायावर मारून त्याला दूर करा आणि तेथून दूर जा.
मनगट थेट नाकावर - तुमची छेडछाड होत असल्याचा अंदाज आल्यास स्वत:चे संरक्षण करण्यासाठी हात उचलायला घाबरू नका. हाताचा तळवा थेट नाकावर मारल्यास जोरदार झटका बसू शकतो.