मासिक पाळी आल्यावर मुलींची उंची का वाढत नाही? पालकांनी वेळीच जाणून घ्या कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 03:17 PM2022-09-12T15:17:56+5:302022-09-12T15:22:47+5:30

पाळीमुळे होणाऱ्या हॉर्मोन्स बदलांमुळे 14 ते 15 व्या वर्षांपासून मुलींची उंची वाढणं कमी होतं. आज आपण या मागची कारणं सविस्तर जाणून घेणार आहोत.

girls height stops growing after menstruation know reason or why | मासिक पाळी आल्यावर मुलींची उंची का वाढत नाही? पालकांनी वेळीच जाणून घ्या कारणं

मासिक पाळी आल्यावर मुलींची उंची का वाढत नाही? पालकांनी वेळीच जाणून घ्या कारणं

googlenewsNext

मासिक पाळी (Periods) येणं हे नैसर्गिक आहे आणि यावर महिलांचं शारीरिक व मानसिक आरोग्य अवलंबून असतं. मुलीला पाळी सुरू झाली की, मुलगी वयात आली असं समजलं जातं. पण पाळी आल्यानंतर मुलींची उंची वाढणं कमी होतं. पाळीमुळे होणाऱ्या हॉर्मोन्स बदलांमुळे 14 ते 15 व्या वर्षांपासून मुलींची उंची वाढणं कमी होतं. आज आपण या मागची कारणं सविस्तर जाणून घेणार आहोत. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय.

मुलींची शारीरिक वाढ कधी थांबते?
लहानपणी मुलींची उंची (Height) खूप वेगाने वाढते आणि वयात येताच त्यांची वाढ पुन्हा खूप जास्त होते. पण वयाच्या 14 ते 15 वर्षी किंवा मासिक पाळी सुरू झाल्यावर मुलींची उंची झपाट्याने वाढणं थांबतं. अशा परिस्थितीत मुलीची उंची खूप कमी असेल तर तिच्या पालकांनी एखाद्या चांगल्या बालरोगतज्ज्ञांना भेटून मुलीच्या उंचीबद्दल चर्चा करणं आणि त्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

वयात येणं शरीराच्या वाढीवर कसं परिणाम करतं?
मासिक पाळी सुरू होण्याच्या एक-दोन वर्षआधी मुलींची जास्त वाढ झाल्याचं दिसून येतं. पण बहुतेक मुली 8 ते 13 व्या वर्षी वयात येऊ लागतात. आणि नंतर त्यांची उंची 10 ते 14 वर्षांच्या दरम्यान वेगाने वाढते. पहिल्यांदा पाळी आल्यानंतर एक किंवा दोन वर्षानंतर त्यांची उंची फक्त 1 ते 2 इंच वाढते. या दरम्यान ती तिच्या अडल्ट हाइटवर पोहोचते. अनेक मुली 14 ते 15 वर्षांच्या वयापर्यंत त्यांच्या अडल्ट हाइटपर्यंत पोहोचतात. काही मुली कमी वयातच अडल्ट हाइटपर्यंत (Adult Height) पोहोचतात. त्यामुळे मुलीची मासिक पाळी कधी सुरू होत आहे यावर तिची अडल्ट हाइट अवलंबून असते. जर 15 व्या वर्षापर्यंत तुमच्या मुलीची पाळी आली नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

स्तनांचा आकार वाढणं आणि वयात येणं, यांचा काय संबंध?
स्तनांचा आकार (Breast Size) वाढणं हे मुलगी वयात येण्याचं लक्षण असतं. कोणत्याही मुलीची मासिक पाळी सुरू होण्याच्या 2 वर्ष आधी स्तनांचा आकार वाढू लागतो. तर, काही मुलींमध्ये मासिक पाळी सुरू झाल्यानंतर एक वर्षानंतरच ब्रेस्ट बड्स दिसू लागतात. त्याचबरोबर काही मुलींमध्ये मासिक पाळीच्या तीन ते चार वर्षानंतरही स्तनांचा आकार वाढण्यास सुरुवात होत नाही.

मुलांपेक्षा मुली आधी वयात येतात. साधारणपणे मुलं वयाच्या 10 ते 13 वर्षांच्या दरम्यान वयात येऊ लागतात आणि 12 ते 15 वर्षांच्या दरम्यान त्यांची शारीरिक वाढ होते. याचा अर्थ मुलींमध्ये वाढ झाल्यानंतर दोन वर्षांनी मुलांमध्ये वाढ सुरू होते. बहुतेक मुलांची उंची वाढणं वयाच्या 16 व्या वर्षापर्यंत सुरू राहतं. पण त्यांच्या स्नायूंमध्ये वाढ सुरू असते.

मुलींची सरासरी उंची किती असते?
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शननुसार (CDC) 20 आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढ महिलांची सरासरी उंची 63.7 इंच म्हणजे साधारण 5 फूट 4 इंच असते. उंचीमध्ये अनुवंशिकता कोणती भूमिका बजावते? मुलाची उंची सहसा पालकांच्या उंचीवर अवलंबून असते. कारण उंची कमी असलेल्या मुलांना घेऊन तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यावर ते आधी पालकांच्या उंचीबद्दल विचारतात.

उंची वाढण्यास वेळ लागण्याची कारणं कोणती?
कुपोषणापासून ते औषधांपर्यंत अनेक गोष्टी तुमच्या शरीराच्या वाढीवर परिणाम करू शकतात. ग्रोथ हॉर्मोनच्या समस्या, संधिवात किंवा कॅन्सर अशा विविध रोगांमुळे काही मुलींची उंची वाढत नाही. शिवाय जीन्सदेखील उंची वाढण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

Web Title: girls height stops growing after menstruation know reason or why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.