सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नैराश्याचा धोका मुलींमध्ये दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 11:21 AM2019-01-07T11:21:46+5:302019-01-07T15:20:50+5:30

सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या मुलींना डिप्रेशन म्हणजेच नैराश्याचा धोका अधिक असतो असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

Girls twice more likely to be depressed due to social media use | सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नैराश्याचा धोका मुलींमध्ये दुप्पट

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नैराश्याचा धोका मुलींमध्ये दुप्पट

googlenewsNext
ठळक मुद्देदिवसातील बराच वेळ अनेकजण फेसबुक, ट्वीटर यासारख्या सोशल मीडियावर घालवत असतात. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या लहान मुलींना डिप्रेशन म्हणजेच नैराश्याचा धोका अधिक असतो असं  एका अभ्यासातून समोर आलं आहे. मुलांपेक्षा मुलींमध्ये सोशल मीडियाचा अतिवापर नैराश्यासाठी कारणीभूत ठरू शकतो.

लंडन - जगभरात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. दिवसातील बराच वेळ अनेकजण फेसबुक, ट्वीटर यासारख्या सोशल मीडियावर घालवत असतात. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या मुलींना डिप्रेशन म्हणजेच नैराश्याचा धोका अधिक असतो असं  एका अभ्यासातून समोर आलं आहे. मुलांपेक्षा मुलींमध्ये सोशल मीडियाचा अतिवापर नैराश्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. लंडन कॉलेज विद्यापीठाने केलेल्या अभ्यासातून हा दावा करण्यात आला आहे. 

संशोधकांनी 14 वर्ष वयोगटातील 11 हजार मुलींचा अभ्यास केला यामध्ये दिवसातल्या पाच तासांपेक्षा जास्त वेळ सोशल मीडियावर घालवणाऱ्या 40 टक्के मुलींमध्ये नैराश्याची लक्षणं दिसून आली. मुलांमध्ये हे प्रमाण 15 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. सोशल मीडियाचा वापर न करणाऱ्या मुलींचे प्रमाण केवळ चार टक्के, तर मुलांचे 10 टक्के असल्याचे ही या अभ्यासातून समोर आले आहे.  सोशल मीडियाचा कमी वापर करणाऱ्या 12 टक्के मुलांमध्ये तसेच या माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करणाऱ्या 38 टक्के व्यक्तींमध्ये अधिक तीव्र नैराश्याची लक्षणे आढळल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे.

‘युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन’च्या एका प्राध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाचा अतिवापर आणि नैराश्याची लक्षणे यांच्यातील संबंध मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये जास्त दिसून येतो. सोशल मीडिया आणि नैराश्यातील संबंधाचा कार्यकारणभाव समजून घेण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला तेव्हा इंटरनेटवरून छळणूक (ऑनलाइन हॅरॅसमेंट, सायबर बुलिंग) झाल्याचे प्रकार 40 टक्के मुली आणि 25 टक्के मुलांनी अनुभवल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Web Title: Girls twice more likely to be depressed due to social media use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.