सायलेंट किलर असतो ब्रेन कॅन्सर; आता उपचार करणं होऊ शकतं सोपं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 01:11 PM2018-12-20T13:11:08+5:302018-12-20T13:12:35+5:30

सध्या जगासमोर कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर नियंत्रण मिळवण्याचं आव्हान उभं ठाकलं आहे. जगभरातील अनेक वैज्ञानिक यावर उपायकारक औषधं तयार करण्यासाठी प्रयत्न करत असून त्यासंदर्भात अनेक नवनवीन संशोधनं करण्यात येत आहेत.

Glioblastoma or Brain Cancer Scientists Discover New Medicine For Cure Also Check Types | सायलेंट किलर असतो ब्रेन कॅन्सर; आता उपचार करणं होऊ शकतं सोपं

सायलेंट किलर असतो ब्रेन कॅन्सर; आता उपचार करणं होऊ शकतं सोपं

googlenewsNext

सध्या जगासमोर कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर नियंत्रण मिळवण्याचं आव्हान उभं ठाकलं आहे. जगभरातील अनेक वैज्ञानिक यावर उपायकारक औषधं तयार करण्यासाठी प्रयत्न करत असून त्यासंदर्भात अनेक नवनवीन संशोधनं करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या एका संशोधनातून एका औषधाचा शोध लावण्यात आला आहे. हे औषध आतापर्यंतच्या सर्वात भयकंर समजल्या जाणाऱ्या ब्रेन कॅन्सर म्हणजेच Glioblastoma वर परिणामकारक ठरतं. 

वर्जीनिया पॉलिटेक्निक इंस्टिट्यूट आणि अमेरिकेतील स्टेट यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी हे यशस्वी संशोधन केलं आहे. त्यांनी सांगितलं की, आपल्या शरीरामध्ये ज्या ऊती असतात त्यांचा जास्तीत जास्त भाग हा द्रव्यांपासून तयार झालेला असतो. ऊती या पेशींपासून तयार झालेल्या संस्था असतात. ऊती हे समान मूळ असलेल्या पेशींपासून तयार झालेल्या असतात. ज्या एकत्रितपणे एक विशिष्ट कार्य करतात. अनेक ऊती मिळून एक अवयव बनवतात. या ऊती शरीरातील पेशींच्या आजूबाजूला द्रव्य स्वरूपात फिरत असतात आणि शरीराच्या सामान्य कामासाठी आवश्यक असतात. अनेकदा या द्रव्यामुळे शरीराला इजा पोहोचण्याचाही धोका असतो. 

Glioblastoma म्हणजेच ब्रेन कॅन्सरमध्ये या द्रव्याचा दाब जास्त प्रमाणात असतो. ज्यामुळे द्रव्य वेगाने पेशींभोवती फिरत असतं. या द्रव्यामुळेच ब्रेनमध्ये तयार होणाऱ्या कॅन्सरच्या पेशी शरीरामध्ये पसरतात. संशोधकांनुसार, कॅन्सरच्या उपचारादरम्यानही हे द्रव्य उपयोगी ठरू शकतं. 

संशोधकांनी या द्रव्यामध्ये एका औषधाचा उपयोग केला. त्यादरम्यान असं आढळून आलं की, हे औषधं द्रव्यामधून पेशींभोवती फिरतं आणि कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी मदत करू शकतं. अद्याप या औषधाचं परिक्षण करण्यात आलेलं नाही. परिक्षण केल्यानंतरच हे औषध ब्रेन कॅन्सरने ग्रस्त असलेल्या रूग्णांसाठी बाजारात उपलब्ध करण्यात येईल. 

ब्रेन ट्यूमरचे प्रकार :

मेलिग्नेंट ट्यूमर 

कॅन्सरच्या या प्रकारामध्ये कॅन्सरच्या पेशी फार संवेदनशील असतात. या पेशी मेंदूमध्ये वेगाने वाढतात. फक्त मेंदूवरच परिणाम करत नाहीत तर डोक्याच्या इतर भागांवर आणि मणक्यावरही या पेशी पसरतात.  

बिनाइन ट्यूमर

मेंदूच्या भागात होणारा हा ट्यूमर नॉन कॅन्सरस असून तो काढूनही टाकता येतो. परंतु हा ट्यूमर पुन्हा होण्याचा धोका असतो. बिनाइन ट्यूमर मेंदूच्या इतर भागांमध्ये पसरत नाही. काही रूग्णांमध्ये या ट्यूमरचे रूपांतर मेलिग्नेंट ट्यूमरमध्येही होऊ शकतं. 

ब्रेन ट्यूमरची लक्षणं :

ब्रेन ट्यूमरची लक्षणं ट्यूमरची साइज आणि मेंदूच्या कोणत्या भागात आहेत यावर अवलंबून असतात. 

- सतत डोकेदुखी आणि उलट्या होणं

- चालताना सतत डगमगनं

- स्मरणशक्तीवर परिणाम होणं

- स्वभावावर परिणाम होणं

- बोलताना, ऐकताना किंवा पाहताना अनेक समस्य उद्भवणं

- अस्वस्थ वाटणं

- भिती वाटणं

- चेहऱ्याच्या काही भागांमध्ये कमजोरपणा जानवणं 

Web Title: Glioblastoma or Brain Cancer Scientists Discover New Medicine For Cure Also Check Types

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.