२०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये 'या' गंभीर आजाराच्या केसेसमध्ये ३ पटीने वाढ!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 10:07 AM2019-08-14T10:07:53+5:302019-08-14T10:10:01+5:30
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने याबाबत माहिती दिली आणि सांगितले की, जगभरात गोवरच्या लसीबाबत लोकांचा विरोध बघायला मिळत आहे.
(Image Credit : www.thenews.com.pk)
लस आणि वेगवेगळे उपाय असूनही जगभरात Measles म्हणजेच गोवरच्या केसेस ३ पटीने वाढलेल्या बघायला मिळत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत २०१९ मध्ये आतापर्यंत ७ महिन्यात गोवरच्या रूग्णांमध्ये ३ पटीने वाढ झाली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने याबाबत माहिती दिली आणि सांगितले की, जगभरात गोवरच्या लसीबाबत लोकांचा विरोध बघायला मिळत आहे.
२००६ मध्ये सर्वात जास्त रूग्ण
WHO च्या आकडेवारीनुसार, २०१९ च्या सुरूवातीला ७ महिन्यात जगभरात गोवरचे ३ लाख ६४ हजार ८०० रूग्ण समोर आले आहेत. तर हीच संख्या गेल्यावर्षी याच कालावधीत १ लाख २९ हजार २३९ इतकी होती. WHO चे प्रवक्ता क्रिश्चियन लिंडमेअर म्हणाले की, २००६ नंतर नोंदवण्यात आलेली गोवरची ही सर्वात जास्त आकडेवारी आहे. ही आकडेवारी या कारणानेही धक्कादायक आहे कारण जगभरात १० पैकी एकच केस नोंदवली जाते. इतर रूग्णांची नोंदच होत नाही.
१० ते १२ दिवसात बघायला मिळतात लक्षणे
गोवर हा एक घातक वायरल आजार आहे. सुरक्षित आणि प्रभावी लस उपलब्ध असूनही हा आजार जागतिक स्तरावर छोट्या मुलांच्या मृत्युच एक मुख्य कारण बनत आहे. WHO नुसार, या आजाराने ग्रस्त व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकन्यातून व्हायरस दुसऱ्या लोकांच्या शरीरात प्रवेश करतात. या आजाराचे प्राथमिक लक्षणे १० ते १२ दिवसांआधी बघायला मिळतात. तर हा आजार रोखण्यासाठी २ डोज वॅक्सीन आणि लसीकरण उपलब्ध आहे. पण WHO ने सांगितले की, गेल्या काही महिन्यात वॅक्सिनेशन रेटमध्ये कमतरता आढळली.
'इथे' तर ९०० टक्के झाली वाढ
आफ्रिकन भागात तर गोवरच्या केसेसमध्ये तब्बल ९०० टक्क्यांनी वाढ झालेली बघायला मिळाली. तेच अमेरिकेत सुद्धा २०१९ मध्ये आतापर्यंत १२०० गोवरच्या केसेस समोर आल्या आहेत. तर गेल्यावर्षी अमेरिकेत केवळ ३७२ केसेस समोर आल्या होत्या. यूरोपमध्ये आतार्यंत ९० हजारांपेक्षा अधिक केसेस समोर आल्या आहेत. WHO ने दावा केला आहे की, गोवरची लस आणि वॅक्सिन पूर्णपणे सुरक्षित आहे. याबाबतचे गैरसमज लोकांमधून दूर व्हायला हवेत.