Coronavirus: कोरोनावर ग्लुकोजसारखे औषध; किंमतही आवाक्यातच असणार, उपचारासाठीची 'संजीवनी' कितीला मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 09:05 AM2021-05-16T09:05:02+5:302021-05-16T09:05:42+5:30

ज्या रुग्णांना हे औषध देण्यात आले त्यांच्यात नाडीचे ठोके, रक्तदाब, ताप आणि श्वसनाची गती या लक्षणांमध्ये त्वरित सुधारणा झाल्याचे आढळले.

Glucose-like drug on coronavirus; how much will get the 'revival' for treatment | Coronavirus: कोरोनावर ग्लुकोजसारखे औषध; किंमतही आवाक्यातच असणार, उपचारासाठीची 'संजीवनी' कितीला मिळणार?

Coronavirus: कोरोनावर ग्लुकोजसारखे औषध; किंमतही आवाक्यातच असणार, उपचारासाठीची 'संजीवनी' कितीला मिळणार?

Next

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला परतवून लावण्यासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकार युद्धपातळीवर काम करत असून कोरोनाप्रतिबंधक लसींच्या उत्पादनाला लागणाऱ्या मंजुऱ्या तातडीने देत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुढाकाराने बाजारात आलेले ‘२-डिऑक्सी डी-ग्लुकोज’ अर्थात ‘२-डीजी’ हे औषध गेम चेंजर ठरणार आहे. जाणून घेऊ या औषधाविषयी...

‘२-डीजी’ औषधाला गेम चेंजर का संबोधले जात आहे?
डीआरडीओ आणि डॉ. रेड्डीज लॅबरोटरीज या दोघांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या ‘२-डीजी’ औषधाच्या वैद्यकीय चाचण्यांवेळी या औषधाच्या मात्रा ज्यांना दिल्या गेल्या त्या रुग्णांपैकी ४२ टक्के रुग्णांना तिसऱ्या दिवशी बाहेरून ऑक्सिजन देण्याची गरज भासली नाही 

ज्या रुग्णांना हे औषध देण्यात आले त्यांच्यात नाडीचे ठोके, रक्तदाब, ताप आणि श्वसनाची गती या लक्षणांमध्ये त्वरित सुधारणा झाल्याचे आढळले. ६५ वर्षे वय असलेल्या रुग्णांमध्येही सकारात्मक बदल निदर्शनास आले. ‘२-डीजी’ औषधाने केवळ ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होत नाही तर रुग्णालयातील मुक्कामाचा अवधीही कमी करतो, असा दावा डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.

विषाणूला मिळणारी ऊर्जा रोखते

  • ‘२-डीजी’ औषध फक्त कोरोना विषाणूने संक्रमित झालेल्या पेशींमध्ये जमा होते.
  • कोरोना विषाणू ऊर्जेसाठी या औषधाचा ग्लुकोज समजून वापर करायला लागतात.
  • येथेच फसगत होते. विषाणूला ऊर्जा प्राप्त होत नाही उलटपक्षी ऊर्जा रोखली जाते. त्यामुळे विषाणूचा फैलाव बंद होतो.

 

अति करू नका..
कोरोनापासून बचाव करण्याच्या नावाखाली हे औषध अतिप्रमाणात घेऊ नये, असेही सूचित करण्यात आले आहे

किंमत किती असेल

₹ ५०० ते ६०० जेनेरिक औषध असल्याने औषधाच्या एका पाऊचची किंमत

कमी किमतीत त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येऊ शकेल. ‘२-डीजी’च्या निर्मितीसाठी विदेशी कच्च्या मालावर अवलंबून रहावे लागणार नाही.

औषध कसे आणि किती घ्यावे...

ग्लुकोज पावडरींप्रमाणे हे औषध पाऊचमध्ये पावडर स्वरूपात मिळू शकेल. 

ते पाण्यात टाकून बाधिताला दिले जाते.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये, असा सल्ला डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.

Web Title: Glucose-like drug on coronavirus; how much will get the 'revival' for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.