ग्लुटेनयुक्त पीठ महिलांसाठी ठरतंय घातक; लग्न सुद्धा मोडतात, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 05:52 PM2020-02-16T17:52:41+5:302020-02-16T18:08:02+5:30
सध्याच्या काळात महिलांना व्यस्त जीवनशैली मुळे नकळतपणे अनेक आजारांचा सामना करावा लागतो.
सध्याच्या काळात महिलांना व्यस्त जीवनशैलीमुळे नकळतपणे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. एम्सने मुल न होण्याच्या वाढत्या समस्या लक्षात घेऊन संशोधन केले आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण या संशोधनातून धक्कादायक बाब समोर आली आहे. या संशोधनातून असं दिसून आलं की महिलांमध्ये सिलिएकचा आजार झपाट्याने वाढत आहे.
(image credit-webmD)
हा आजार गहू, जवस, राई आणि ओट्स मध्ये असलेल्या ग्लुटेनमुळे होत आहे. अलिकडे गव्हाच्या पिठात ग्लुटेनचं प्रमाण जास्त असतं. अनेक घरातील महिलांच्या आहारात ग्लुटेन वारंवार जात असतं. या आजाराच्या सुरूवातीच्या लक्षणात अपचन, एनिमिया, तोंडाचा अल्सर, उलटी, मळमळ होणे, चिडचिड होणे, हाडांचे दुखणे, हात पाय दुखणे, त्वचेवर चट्टे येणे, केस गळणे, लगेच थकवा येणे ही लक्षणं दिसून येतात.
हा आजार मुलांना सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे त्यांची उंची आणि वजन यांवर परीणाम होत असतो. या रिसर्चनुसार या महिला या निपुत्रिक होण्याच्या शिकार होत आहेत. यामुळेच अनेक लग्न सुद्धा तुटत आहेत. ग्लूटेन फ्री अन्नाचं सेवन करून या समस्येपासून लांब राहता येऊ शकतं. ( हे पण वाचा-सावधान! 'या' लिंकवर क्लिक कराल, तर ऑनलाईन कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकाल!)
(image credit-idiva)
एम्सच्या डिपार्टमेंट ऑफ गॅस्ट्रॉएंट्रोलॉजी चे प्रोफेसर यांनी सांगितले की महिलांना अनेकदा लक्षात येत नाही पण ग्लुटेनयुक्त आहार घेतल्यामुळे महिला निपुत्रिक होत आहेत. जर कोणत्याही महिलेला सीलिएकची समस्या उद्भवल्यास यावर उपाय म्हणून ग्लुटेन फ्री आहार घेणं हा उत्तम पर्याय आहे. ( हे पण वाचा-प्लॅनिंग बोंबलेल म्हणून पाळी पुढे करण्याच्या गोळ्या घेत असाल, तर 'या' गंभीर समस्यांचे व्हाल शिकार!)