रोज कामासाठी घराबाहेर पडत असाल; कुटुंबाचा संसर्गापासून बचाव करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 12:08 PM2020-08-06T12:08:45+5:302020-08-06T12:13:19+5:30
CoronaVirus News & Latest Updates : तुम्हाला कामासाठी घराबाहेर पडावं लागत असेल तर संसर्गापासून बचावासाठी काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. कारण घराबाहेर पडल्यानंतर अनेक ठिकाणी संसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणून वेळीच खबरदारी घ्यायला हवी.
कोरोनाकाळात संसर्गापासून बचावासाठी प्रत्येकजण खबरदारी बाळगताना दिसून येत आहे. मास्कचा, सॅनिटायजरचा वापर हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनला आहे. जर तुम्हाला कामासाठी घराबाहेर पडावं लागत असेल तर संसर्गापासून बचावासाठी काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. कारण घराबाहेर पडल्यानंतर अनेक ठिकाणी संसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणून वेळीच खबरदारी घ्यायला हवी.
गरम पाण्याचे सेवन करा
बाहेरून घरात आल्यानंतर गरम पाणी प्या. याशिवाय गरम पाण्याची बाटली बाहेर जाताना सोबत ठेवा. सार्वजनिक स्थळी, प्रवासादरम्यान व्हायरसचा संसर्ग झाला असेल तर गरम पाण्याच्या सेवनाने त्याचा प्रभाव फारकाळ टिकू शकणार नाही.
दिवसभरात शरीराला पाण्याची जितकी आवश्यकता असते. तितक्या पाण्याचे सेवन करायलाच हवं. योग्य प्रमाणात पाण्याचं सेवन करून तुम्ही शरीराला हायड्रेट ठेवाल तर व्हायरस फारकाळ टिकू शकणार नाही.
मागील काही दिवसात रशियाच्या आरोग्य तंज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पाण्यात कोरोना व्हायरस पूर्णपणे नष्ट होतो. यासंदर्भातील स्टडी स्टेट रिसर्ट सेंटर ऑफ व्हायरॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी वेक्टरद्वारे करण्यात आली आहे. या स्टडीमध्ये शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, ७२ तासांत पाणी जवळजवळ पूर्णपणे कोरोना नष्ट करू शकते.
संशोधनानुसार, व्हायरसचे स्वरूप थेट पाण्याच्या तापमानावर अवलंबून असते. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, कोरोना व्हायरसचे ९० टक्के कण २४ तासांत आणि ९९.९ टक्के कण खोलीच्या सामान्य तापमानावर पाण्यात मरतात. संशोधनात असे म्हटले आहे की, उकळत्या पाण्याच्या तपमानावर कोरोना व्हायरस पूर्णपणे आणि त्वरित मरतो. काही परिस्थितींमध्ये व्हायरस पाण्यात राहू शकतो, परंतु तो समुद्रामध्ये किंवा ताज्या पाण्यात वाढत नाही.
हळदीच्या दुधाचे सेवन करा.
दूध आणि हळद यामुळे आपल्या शरीरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचा सोपा उपाय आहे. ज्या व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास जास्त जाणवतो अशा लोकांनी हळदीच्या दुधाचं सेवन करणं गरजेचं आहे. त्वचेसाठी हळदीचे दूध अतिशय लाभदायी ठरते. हे दूध प्यायल्यानं तुमची त्वचा उजळते. हळदीमध्ये एंटिऑक्सिडंट गुण असल्याने आरोग्याशी संबंधित आजार दूर ठेवण्यास मदत मिळते.
व्हायरसनं शरीरात प्रवेश केल्यानंतर काही लक्षणं दिसायला सुरूवात होते. कोरोनाची लक्षणं सौम्य दिसत असतील. घरगुती उपाय केल्यानं किंवा खबरदारी बाळगल्याने आजारांपासून लांब राहता येऊ शकतं. फुफ्फुसांमध्ये सूज येणं. घसा खवखवणं, खोकला येणं, श्वास घ्यायला त्रास होणं अशा शारीरिक समस्या निर्माण होतात. गरम पाणी, वाफ घेणं, हळदीच्या दुधाचं सेवन करणं असे उपाय करून तुम्हाला व्हायरसच्या संक्रमणापासून लांब राहता येऊ शकतं.
खुशखबर! कोरोनाच्या लसीबाबत 'या' देशातील कंपनीची दिलासादायक माहिती; तज्ज्ञ म्हणाले की...
पावसाळ्यात सुका खोकला आणि कफची समस्या टाळण्यासाठी आधीच वापरा 'हे' सोपे उपाय