वजन कमी करण्यासाठी आणि मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी इफेक्टिव्ह ठरेल 'गोलो डाएट', जाणून घ्या कसं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 12:20 PM2020-02-09T12:20:56+5:302020-02-09T13:16:43+5:30
सध्याच्या काळत वजन कमी करण्यासाठी महिलांच नाही तर पुरूष सुद्धा वेगवेगळे प्रयोग करत असतात.
सध्याच्या काळत वजन कमी करण्यासाठी महिलांच नाही तर पुरूष सुद्धा वेगवेगळे प्रयोग करत असतात. सगळ्यात कॉमन आणि सोपं वाटणारं म्हणजे डाएटिंग अनेक लोकं करत असतात. जर तुम्ही सुद्धा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात वेगवेगळे उपाय करून थकला असाल तर आज आम्ही तुम्हाला गोलो डाएटबद्दल सांगणार आहोत. काहीही एक्स्ट्रा मेहनत न करता वजन कमी करण्यासाठी फक्त जर तुम्ही गोलो डाएट फॉलो केला तर झटपट वजन कमी होईल. शरीरातील वाढत्या फॅट्सना आणि कॅलरीज् नियंत्रित करण्यासाठी गोलो डाएट फायदेशीर ठरत असतं.
गोलो डाएटचे फायदे
गोलो डाएटचा शरीरावर प्रभाव पडत असतो. इंसुलिन आणि ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित करून भूक, वजन आणि मेटाबॅलिझम यांना नियंत्रणात आणण्याचे काम गोलो डाएटद्वारे होत असते. इंसुलिन तुमच्या रक्तवाहिन्यांना उर्जा देण्यासाठी काम व्यवस्थित करत नसेल तर त्यामुळे शरीरातील रक्तात साखरेमुळे एक्स्ट्रा फॅट जमा होत जातं. गोलो डाएटमुळे रक्तात साखर आणि इंन्सुलिनचे प्रमाण व्यवस्थित राहते.
काय आहे गोलो डाएट
गोलो डाएटमध्ये वेगवेगळ्या पदार्थाचा आहारात समावेश असतो. यात मासं, भाज्या आणि फळांचा समावेश असतो. या डाएटमुळे तुम्हाला प्रोटीन, कार्ब्स आणि गुड फॅटचे कॉबिंनेशन मिळत असते. तुमच्या शरीराला अशा आहाराची गरज असते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेची पातळी व्यवस्थित असेल आणि भूक सुद्धा व्यवस्थित लागेल. त्यासाठी तुम्ही सकाळच्या नाष्त्यात दोन अंडी, फळं आणि ओट्सचा समावेश करा.
गोलो डाएटमध्ये तुम्ही प्रोटीन्स, कार्बस, आणि ताज्या भाज्यांचा समावेश करायल हवा. याऊलट फास्ट फुड, प्रोसेस्ड फुड, साखरेचे पदार्थ खाण्यापासून दूर रहा. डाळींचा, अंड्याचा, हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा. तसंच दोन वेळेच्या जेवणाच्या मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर ड्रायफ्रुड् खा. तळलेले पदार्थ खाऊ नका. ( हे पण वाचा-'ही' टॅबलेट नेहमी घेत असाल तर कंबर मोडण्याचा वाढेल धोका, वेळीच व्हा सावध!)
गोलो डाइट प्लान नाश्ता
नाष्ता- अंड, ब्रोकोली, बदाम ,ओट्स, फळं , कडधान्यांच्या उसळी.
दुपारचं जेवण- भाकरी, कमी तेलाच्या भाज्या, काकडी, गाजर आणि टॉमॅटोचे सॅले़ड
रात्रीचं जेवण- रात्रीचा आहार खूपच कमी असावा. त्यात सॅलेड आणि एक चपाती भाज्या यांचा समावेश करावा. ( हे पण वाचा-गुलाबाच्या चहाने झटपट वजन करा कमी, ना डाएटची कटकट ना व्यायामाची झंझट!)