'हे' पदार्थ अतिप्रमाणात खाल तर फुफ्फुसांचे होतील इतके गंभीर रोग की कायमचे आजारी राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 03:08 PM2021-08-29T15:08:56+5:302021-08-29T17:06:58+5:30

सध्या कोरोनाच्या महामारीत फुफ्फुसांचं आरोग्य जपणं फार महत्त्वाचं आहे. कोरोनाचा विषाणून प्रथम फुफ्फुसांवर हल्ला करतो. त्यामुळे फुफ्फुसांच्या कार्यावर लक्ष देणं गरजेचं आहे.

good habits for health of lungs, avoid following food or eat in control | 'हे' पदार्थ अतिप्रमाणात खाल तर फुफ्फुसांचे होतील इतके गंभीर रोग की कायमचे आजारी राहाल

'हे' पदार्थ अतिप्रमाणात खाल तर फुफ्फुसांचे होतील इतके गंभीर रोग की कायमचे आजारी राहाल

googlenewsNext

जर तुम्हालला फुफ्फुसांचं आरोग्य सांभाळायचं असेल तर ही बातमी तुमच्यााठीच आहे. सध्या कोरोनाच्या महामारीत फुफ्फुसांचं आरोग्य जपणं फार महत्त्वाचं आहे. कोरोनाचा विषाणून प्रथम फुफ्फुसांवर हल्ला करतो. त्यामुळे फुफ्फुसांच्या कार्यावर लक्ष देणं गरजेचं आहे.

फुफ्फुसांचं कार्य नेमकं कसं असतं?

आरोग्य तज्ज्ञांच्या मानण्याप्रमाणे, फुफ्फुसं आकुंचित झाली की व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. श्वास घेण्यासाठी आपल्या शरीरातील अवयव फुफ्फुस महत्त्वाची भूमिका बजावतं. फुफ्फुस ऑक्सिजनला फिल्टर करायचं काम करतं.

डाएट एक्सपर्ट रंजना सिंग यांच्या सांगण्यानुसार, फुफ्फुसांचं आरोग्य जपण्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे. आहारातील काही गोष्टी अशा आहेत ज्या फुफ्फुसांना कमकुवत बनवतात. धूम्रपान आणि तंबाखू व्यतिरिक्त, प्रक्रिया केलेलं मांस, साखरयुक्त पेयं आणि जास्त अल्कोहोल पिण्यामुळे तुमचं फुफ्फुसं खराब होऊ शकतात. त्यामुळे त्यांचे सेवन करू नका.

फुफ्फुसांना नुकसान पोहचवणाऱ्या गोष्टी

मीठ
आहार तज्ञ डॉ रंजना सिंह सांगतात, मीठ आरोग्यासाठी आवश्यक मानले जाते, परंतु जर ते जास्त प्रमाणात वापरलं गेलं तर ते फुफ्फुसांच्या समस्या वाढवू शकतात. त्यामुळे फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी मीठ कमी वापरा.

साखरयुक्त पेय
डॉक्टर रंजना सिंह म्हणतात की जर ते नेहमी फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी साखरयुक्त पेयांपासून दूर राहा. त्यांच्या नियमित सेवनाने प्रौढांमध्ये ब्राँकायटिस होण्याची शक्यता असते. साखरयुक्त पेयांऐवजी, आपण जास्त पाणी प्यावं.

डेयरी प्रोडक्ट्स
दुग्धजन्य पदार्थ जसं की दूध, दही आणि चीज आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, परंतु जेव्हा आपण त्याचं अधिक प्रमाणात सेवन करतो तेव्हा ते फुफ्फुसांसाठी हानिकारक ठरतात. म्हणूनच, दुग्धजन्य पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.

मद्यपान
आहार तज्ञ डॉ रंजना सिंह म्हणतात की, दारू आपल्या शरीरासाठी फार घातक आहे. हे फुफ्फुसांसाठी हानिकारक आहे. त्यामधील सल्फाइट्स दम्याची लक्षणं वाढवू शकतात. अल्कोहोलमध्ये इथेनॉल देखील असतं, जे फुफ्फुसांना हानी पोहोचवू शकतं.

Web Title: good habits for health of lungs, avoid following food or eat in control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.