कॅन्सरवर होणार आता स्वस्तात उपचार, 42 औषधांच्या किमतीत मोठी कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 02:49 PM2019-02-28T14:49:24+5:302019-02-28T15:17:19+5:30
कॅन्सरवरील 42 नॉन-शेड्यूल्ड औषधांच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. भारत सरकारने कॅन्सरच्या औषधांवरील विक्रीवर असलेले ट्रेड मार्जिन (trade margins) 30 % केले आहे.
नवी दिल्ली - कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर ठोस असा उपाय समोर आलेला नाही. अनेक प्रकारच्या सर्जरी आणि कीमोथेरपीच्या मदतीने कॅन्सरवर उपचार करता येतात. कॅन्सरग्रस्त व्यक्तींसाठी आता एक खूशखबर आहे. कॅन्सरवरील 42 नॉन-शेड्यूल्ड औषधांच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.
भारत सरकारने कॅन्सरच्या औषधांवरील विक्रीवर असलेले ट्रेड मार्जिन (trade margins) 30 % केले आहे. ट्रेड मार्जिनमधून औषधं विक्रेता आणि होलसेलर औषधं विक्रेता जबरदस्त नफा कमवतात. त्यामुळे औषधांच्या किंमती अधिक वाढल्या आहेत. ट्रेड मार्जिन अंतर्गत या औषधांवर मूल्य नियमनाअंतर्गत (price regulation) सूट मिळणार आहे. डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्सने याबाबत एक नोटिफिकेशन जारी केले आहे.
कॅन्सर या आजारावरील उपचार खर्चिक असतात. त्यामुळे या औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 8 मार्चपासून या नव्या किंमती लागू करण्यात येणार आहेत. ‘ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर’, 2013 च्या पॅरा 19 चा वापर हा व्यापारातील नफा ठरविण्याकरिता सरकारने केला आहे. या यादीत समाविष्ट नसलेल्या औषधांवर कंपन्या इच्छेनुसार ट्रेड मार्जिन लागू शकतील.
एका वर्षात कॅन्सर नष्ट करणाऱ्या औषधाचा शोध, संशोधकांनी केला दावा!
कॅन्सर मुळातून नष्ट होण्याचं प्रमाण फार कमी आहे. कॅन्सरबाबत जगभरात सतत वेगवेगळे शोध सुरू असतात. असाच एका शोध इस्त्राइलच्या संशोधकांनी केला आहे. या शोधात त्यांनी दावा केला आहे की, ते कॅन्सरला नष्ट करणारं असं औषध तयार करू शकतात, ज्याने कॅन्सर एका वर्षात बरा होऊ शकतो.
बायोटेक कंपनी AEBi चा दावा
तसे तर कॅन्सरवर वेगवेगळे उपचार केले जातात. पण हा आजार मुळातून नष्ट करण्याचा दावा कुणीच करत नाही. पण इस्त्राइलच्या अॅक्सिलेरेटेड इवॉल्यूशन बायोटेक्नॉलॉजी लिमिटेड (AEBi) कंपनीने हा दावा केला आहे. त्यांनी दावा केलाय की, कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराला ते पूर्णपणे दूर करू शकतात.
या शोधात दावा करण्यात आला आहे की, बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने आणि पेप्टाइड्सच्या मदतीने कॅन्सरला नष्ट करणारं औषध तयार करण्यात आलं आहे. पेप्टाइट्सला अमीनो अॅसिडचं रूप मानलं जातं. सध्या या शोधात तयार करण्यात आलेलं औषध मनुष्यावर वापरण्यात आलेलं नाहीय. शोधादरम्यान या औषधाचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला होता. त्यावरून हा दावा करण्यात येत आहे. पण या दाव्यावर इतर संशोधकांनी टीका केली आहे.