खुशखबर!! मलेरियावर दुसऱ्या लसीला मान्यता, सीरम इन्स्टिट्यूट बनवणार १० कोटी डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 03:27 PM2023-10-03T15:27:31+5:302023-10-03T15:29:18+5:30

पहिल्या आणि दुसऱ्या लसी फरक काय, जाणून घ्या WHO काय सांगते?

Good News for whole world as WHO approves R21 second malaria vaccine for use Pune Serum Institute of India to make 10 crore doses | खुशखबर!! मलेरियावर दुसऱ्या लसीला मान्यता, सीरम इन्स्टिट्यूट बनवणार १० कोटी डोस

खुशखबर!! मलेरियावर दुसऱ्या लसीला मान्यता, सीरम इन्स्टिट्यूट बनवणार १० कोटी डोस

googlenewsNext

Malaria 2nd Vaccine: भारतात विविध साथीचे आजार वेगवेगळ्या ऋतुंमध्ये बळावताना दिसतात. त्यातील बऱ्याचशा आजारांवर लसी किंवा परिणामकारक औषधी उपचार मिळाले आहेत. तशातच आता संपूर्ण जगभरासाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे. R21 ही जगातील दुसरी मलेरिया लस असून त्याला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिली आहे. पुढील वर्षापासून ती लस बाजारात उपलब्ध होईल. या एका डोसची किंमत १६६ ते ३३२ रुपये असेल.

बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने बनवली आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी - अदार पुनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी दरवर्षी लसीचे 10 कोटी डोस तयार करण्याचा करार करण्यात आला आहे. जर एखाद्या व्यक्तीला मलेरिया असेल, तर त्याला या लसीचे 4 डोस घ्यावे लागणार आहेत.

जगाला २ वर्षांपूर्वी मिळाली होती मलेरियाची पहिली लस

२०२१ मध्ये, WHO ने RTS,S/AS01 ही पहिली मलेरिया लस मंजूर केली. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस म्हणाले- आम्ही २ वर्षांपूर्वी मलेरियाच्या पहिल्या लसीला मान्यता दिली होती. आता आमचे लक्ष जगभरात मलेरियाची लस तयार करण्यासाठी निधीची व्यवस्था करण्यावर असेल, जेणेकरून ही लस प्रत्येक गरजू देशापर्यंत पोहोचू शकेल. यानंतर संबंधित देशांची सरकारे ठरवतील की त्यांनी मलेरियावर नियंत्रण ठेवण्याच्या उपाययोजनांमध्ये या लसीचा समावेश करावा की नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मलेरियाची ४० टक्के प्रकरणे लसीने रोखली जाणार

WHO महासंचालक गेब्रेयसस म्हणाले - RTS, S/AS01 आणि R21 मध्ये फारसा फरक नाही. दोघांपैकी कोणता अधिक प्रभावी होईल हे सांगता येत नाही. दोन्ही प्रभावी आहेत. ही लस प्लाझमोडियम फॅल्सीपेरमला न्यूट्रल करते. प्लाझमोडियम फॅल्सीपेरम मलेरियाला कारणीभूत असलेल्या पाच व्हायरसपैकी एक आहे आणि सर्वात धोकादायक आहे. डब्ल्यूएचओच्या मते, लस मलेरियाच्या प्रत्येक १० पैकी ४ प्रकरणांना रोखू शकते आणि १० पैकी ३ लोक गंभीर प्रकरणांमध्ये जीव वाचवू शकतात.

2019 मध्ये, जगभरात मलेरियामुळे 4.09 लाख मृत्यू झाले आहेत, त्यापैकी 67% म्हणजे 2.74% मुले ज्यांचे वय 5 वर्षांपेक्षा कमी आहे. 2019 मध्ये भारतात मलेरियाचे 3 लाख 38 हजार 494 रुग्ण आढळले आणि 77 लोकांचा मृत्यू झाला. 2015 मध्ये सर्वाधिक 384 मृत्यू झाले.

Web Title: Good News for whole world as WHO approves R21 second malaria vaccine for use Pune Serum Institute of India to make 10 crore doses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.