तुम्ही जर स्वतःशी बोलत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 11:24 AM2019-12-17T11:24:35+5:302019-12-17T11:34:08+5:30
कधी कधी तुम्ही अवघड गोष्ट कमी वेळात पूर्ण केली तर तुफान खूश होता.
कधी कधी तुम्ही अवघड गोष्ट कमी वेळात पूर्ण केली तर तुफान खूश होता. तर काहीवेळा एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर नाराज होता. कधी ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर झाला तर अपसेट होता. अर्थात प्रसंग कोणताही असो आपण स्वतःशीच बोलून भावना व्यक्त करत असतो. मनात वेगवेगळे विचार चाललेले असतात. जे तुम्ही खूलेपणाने बोलू शकत नाही ते तुम्ही मनात बोलत असता. स्वतःशी जर तुम्ही बोलत असाल तर मानसीक आरोग्यासाठी फायदेशार ठरतं. मनात बोलण्यामुळे तुम्ही स्वतःला खूप चांगल्याप्रकारे ओळखू शकता. चला तर मग जाणून घेऊया स्वतःशी बोलण्याचे काय आहेत फायदे.
१) आपलं ध्येय गाठता येत
जर तुम्ही स्वतःशी बोलत असाल तर ही सवय चांगली आहे. जर तुम्ही आरश्याच्या समोर उभं राहून स्वतःशी बोलत असाल तर तुमच्यात आत्मविश्वास येईल. तसंच तुम्ही कमी वेळात आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. म्हणून कोणत्याही कठिण प्रसंगी तुम्ही न डगमगता स्वतःला सामोरं जायल हवं.
२) स्वतःला प्राधान्य द्या
जर तुम्ही घरातली तसंच ऑफिसची कामं एकत्र करत असाल तर खूप थकवा आणि ताण निर्माण होत असतो. अशावेळी एकाग्र मनाने स्वतःशी संवाद साधा, नियेजन करा ज्यामुळे रोजच्या कामाचा ताण येणार नाही. सकारात्मकरित्या तुम्ही काम कराल आणि मन सुध्दा प्रफुल्लीत राहील.
३) स्वतःच्या कामाचं कौतुक करणं
जर तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून स्वतःच काम व्यवस्थित पूर्ण करत असाल तर स्वतःच कौतुक करा. जर तुम्ही स्वतःच आत्मपरीक्षण करून स्वतःशी बोलत असाल तर नविन काम करण्यासाठी अधिक उत्साह येईल. तसंच आत्मविश्वास वाढेल.
४) सकारात्मक विचार करा
जर तुम्ही रोजचं ताण-तणावाचं आयुष्य जगत असताना सकारात्मक विचार केलात तर ताण हलका होईल. यासाठी स्वतःशी संवाद साधणं महत्वाचं आहे. कारण विचार, उच्चार आणि आचार या तिन्ही स्थरांवर जर सतत चांगले आणि सकारात्मक विचार केले तर तशीच सकारात्मक परिस्थिती वाट्याला येऊ शकते. नेहमी चांगले, यशाचे, समाधानाचे, उत्तम आरोग्याचे, समृद्धीचे विचार करणे गरजेचे आहे.