रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचं पाणी प्या, अनेक समस्या लगेच होतील दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 06:38 PM2022-08-24T18:38:45+5:302022-08-24T18:39:02+5:30
Benefits Of Amla Water: प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, जर तुम्ही रोज सकाळी आवळ्याचं पाणी प्यायलात तर अनेक समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळेल.
Benefits Of Amla Water: आपल्यापैकी अनेकांना आवळ्याच्या फायद्यांबाबत माहीत आहे. आवळ्यातून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळतं. आवळ्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू बघता याला सुपरफूडही म्हटलं जातं. सामान्यपणे आवळ्याचा ज्यूस, चटणी, भाजी, लोणचं आणि मुरंबा या स्वरूपात सेवन केलं जातं. याचं आणखी एका पद्धतीने सेवन केलं तर आरोग्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो. प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, जर तुम्ही रोज सकाळी आवळ्याचं पाणी प्यायलात तर अनेक समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळेल.
आवळ्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात कारण यात प्रोटीन, कार्ब्स, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि कॅल्शिअम भरपूर प्रमाणात आढळतं. सोबतच यात शुगर अजिबात नसते. त्यामुळे शरीरासाठी हे फार फायदेशीर असतं.
कसं तयार कराल आवळ्याचं पाणी?
आवळ्याचं पाणी तयार करण्यासाठी सर्वातआधी तुम्ही एक चमचा आवळ्याचं पावडर घ्या आणि एक ग्लास पाण्यात मिक्स करा. काळजी घ्या की, पावडर पाण्यात चांगल्याप्रकारे मिक्स करा. नंतर ते गाळून या पाण्याचं सेवन करा.
काय होतात फायदे?
1) वजन कमी करण्यास फायदेशीर
आवळ्यात भरपूर प्रमाणात अमीनो अॅसिड असतं. ज्याच्या मदतीने शरीराचा मेटाबॉलिक रेट चांगला राहतो. यामुळे पोट आणि कंबरेच्या आजूबाजूची चरबी कमी होऊ लागते. हेच कारण आहे की, आवळ्याच्या पाण्याला वेट लॉस ड्रिंक मानलं जातं.
2) डायबिटीसमध्ये फायदेशीर
जे लोक डायबिटीसने ग्रस्त आहेत त्यांना त्यांच्या आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. तसं केलं नाही तर त्यांना इतर गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. सकाळी उठून आवळ्याचं पाणी प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल केली जाऊ शकते.
3) त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, आवळ्याचा वापर अनेक ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये केला जातो. सौंदर्य वाढवण्यासाठी याचा फायदा होतो. पिंपल्स आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी आवळ्याचं पाणी प्यायला हवं. सोबतच मजबूत आणि शायनी केस मिळवण्यासाठी तुम्ही आवळ्याची मदत घेऊ शकता.