GOQii Health Tech: हेल्थ टेक क्षेत्रात 'गोकी'चा दबदबा; कंपनीने लॉंच केला 'हेल्थ मेटाव्हर्स'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 08:10 PM2022-12-09T20:10:13+5:302022-12-09T20:11:33+5:30
आरोग्य आणि गेमिंग तंत्रज्ञानाला एकत्र जोडण्याची ही भन्नाट कल्पना गोकी नागरिकांसाठी घेऊन आलंय.
हेल्थ टेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या गोकी (GOQii) ने आचा स्वत:चा हेल्थ मेटाव्हर्स तयार केलाय. आरोग्य आणि गेमिंग तंत्रज्ञानाला एकत्र जोडण्याची ही भन्नाट कल्पना गोकी नागरिकांसाठी घेऊन आलंय. तशी घोषणा गोकी चे संचालक विशाल गोंदाल यांनी केली. या हेल्थमेटाव्हर्समध्ये गेम खेळत स्पर्धा करत तुम्ही आरोग्यावर नियंत्रण ठेऊ शकता. स्पर्धेमुळे अजुन फिट राहण्याचे प्रोत्साहन मिळते हेच या हेल्थमेटाव्हर्समधून करता येणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात हे मोठे पाऊल आहे.
याशिवाय गोकी ने आज युनायटेड अरब अमिरात (यूएई) मध्ये आता प्रवेश केल्याची घोषणा केली. यूएई हा देश गोकी ने प्रवेश केलेला भारत आणि यूके नंतरचा तिसरा देश ठरला आहे. यूएई मध्ये आता सुरुवातीच्या काळात गोकी तर्फे सर्व समावेशक प्रतिबंधात्मक हेल्थ इकोसिस्टम आणि वेब३ वर आधारीत डिजिटल हेल्थ मेटाव्हर्स उपलब्ध असतील. गोकी ने या आधीही गिटेक्स ग्लोबल या जगातील सर्वांत मोठ्या टेक शो मध्ये भाग घेतला होता आणि त्याच बरोबर जीसीसी क्षेत्रात गुंतवणूक करुन वाढ करण्याचा मानस व्यक्त केला होता.
यूएई मध्ये हेल्थ मेटाव्हर्स प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने गोकी ने हार्ले इंटरनॅशनल मेडिकल क्लिनिक बरोबर भागीदारी केली आहे. त्यामुळे आता यूएई च्या नागरिकांना सर्वसमावेशक डिजिटल डायबेटिस केअर प्रोग्राम उपलब्ध होणार आहे. ही घोषणा गोकीचा वार्षिक कार्यक्रम असलेल्या ‘रिइमॅजिन हेल्थ इन दी मेटाव्हर्स’ या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मुंबई येथे ८ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आली.
गोकीचे संस्थापक आणि सीईओ विशाल गोंदाल यांनी सांगितले “ हार्ले इंटरनॅशनल मेडिकल क्लिनिक बरोबर सहकार्य करतांना आंम्ही खूपच उत्साही आहोत. आम्ही नेहमीच डिजिटल आरोग्यासह प्रतिबंधात्मक आरोग्यावर लक्ष केंद्रित केले असून त्याच बरोबर वापरकर्त्यांना समृध्द अनुभव हा फिटनेस चा प्रसार व आरोग्यपूर्ण बक्षिसे देऊन देऊ केला आहे. डिजिटल हेल्थ आणि फिटनेस मेटाव्हर्स मुळे पुढे जाऊन खर्या जगतातील आरोग्य आणि फिटनेस एकत्र आणून जगभरांतील ग्राहकांना एकत्र आणून फिट आणि आरोग्यपूर्ण राहण्यास मदत होईल. हार्ले इंटरनॅशनल मेडिकल क्लिनिक बरोबर एकत्रितपणे लोकांना मधुमेहाचे व्यवस्थापन करुन त्यांच्या आरोग्या विषयी तज्ञांचा सल्ला घेऊन त्यांचे जीवन सुधारण्यास मदत होईल.”
प्रत्येक वापरकर्त्याला सर्वसमावेशक डिजिटल मंचाच्या माध्यमातून जोडले जाईल आणि त्यांना अत्याधुनिक अशी जोडलेली उपकरणे, आरोग्य विषयक प्रशिक्षक, डॉक्टर्स यांच्या सल्ल्यानुसार त्यांची जीवनशैली बदलून त्यांच्या एचबीए१सी स्तरावर नियंत्रण ठेवण्यास मदत केली जाते.