सर्दी, ताप, ॲलर्जी, अंगदुखीच्या १५६ औषधांवर सरकारकडून बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 09:39 IST2024-08-24T09:39:21+5:302024-08-24T09:39:39+5:30
ही औषधी खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले.

सर्दी, ताप, ॲलर्जी, अंगदुखीच्या १५६ औषधांवर सरकारकडून बंदी
नवी दिल्ली : सर्दी, ताप, ॲलर्जी, अंगदुखी आदी आजारांवर सर्रास वापरण्यात येणारी प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स), जीवनसत्त्वे, वेदनाशामक अशा १५६ औषधांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ही औषधी खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले.
या औषधांत ‘एसिक्लोफेनाक-५०,’ ‘पॅरासिटामोल-१२५ मिलिग्रॅम, पॅरासिटामोल ३०० मिलिग्रॅम, मेफेनैमिक ॲसिड पॅरासिटामोल इंजेक्शन, सेटीरिजीन एचसीएल पॅरासिटामोल फेनिलफ्राइन एचसीएल, लेवोसेटिरिजीन फिनाइलफ्राइन एचसीएल पॅरासिटामोल, पॅरासिटामोल क्लोरफेनिरामाइन मैलेट, फिनाइल प्रोपेनोलामाइन आणि कैमिलोफिन डाइहाइड्रोक्लोराइड- २५ मिलिग्रॅम आदींवरही बंदी आली आहे. या औषधांचा वापर केसगळती, त्वचेची निगा, ताप, अंगदुखी आदीसांठी केला जात होता.