'ही' 16 औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय खरेदी करता येणार? तुमच्या सोयीसाठी सरकार नियम बदलण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 02:09 PM2022-05-27T14:09:01+5:302022-05-27T14:09:34+5:30

Medicines : या वर्षाच्या सुरुवातीला औषध तांत्रिक सल्लागार मंडळाने ओटीसी औषधांवरील सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

government proposes sale of 16 commonly used medicines without doctor prescription | 'ही' 16 औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय खरेदी करता येणार? तुमच्या सोयीसाठी सरकार नियम बदलण्याच्या तयारीत

'ही' 16 औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय खरेदी करता येणार? तुमच्या सोयीसाठी सरकार नियम बदलण्याच्या तयारीत

googlenewsNext

नवी दिल्ली. कोणतेही औषध खरेदी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आणि सूचना घेणे आवश्यक असते. मात्र, आता सर्वसामान्यांच्या सोयीसाठी सरकार या नियमात बदल करणार आहे. यानंतर तुम्ही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय 16 प्रकारची औषधे खरेदी करू शकाल.

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, सरकारने ओव्हर द काउंटर कॅटगरी सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यानंतर औषध आणि कॉस्मेटिक नियम बदलावा लागेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात एक ड्राफ्ट नोटिफिकेशनही जारी केली आहे, ज्यामध्ये 16 प्रकारच्या औषधांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आणि नियम बदलल्यानंतर, ही औषधे वैद्यकीय सल्ल्याशिवाय खरेदी करता येतील. 

मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या 16 औषधांसाठी प्रस्ताव देण्यात आला आहे, त्यात पॅरासिटामॉल 500, काही लेग्जेटिव्स आणि फंगल क्रीम यांचा समावेश आहे. तसेच, मंत्रालयाने आपल्या प्रस्तावावर लोकांकडून सूचना मागितला आहेत, ज्या एका महिन्यात दिला जाऊ शकतील. सध्या मेडिकल स्टोअरमध्ये अनेक औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय उपलब्ध आहेत, परंतु यासाठी अद्याप कोणताही योग्य कायदा किंवा नियम नाही.

या वर्षाच्या सुरुवातीला औषध तांत्रिक सल्लागार मंडळाने ओटीसी औषधांवरील सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. ही संस्था औषधांच्या बाबतीत सरकारला सल्ला देते. या मंजुरीनंतर ओटीसी कॅटगरीबाबत बरीच चर्चा झाली, त्यानंतर 16 औषधांना मान्यता देण्यात आली. पुढे आणखी औषधांचाही यात समावेश केला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

…पण ही अट करावी लागेल मान्य 
सरकारने ओटीसी कॅटगरी लागू करण्यासाठी काही अटीही ठेवल्या आहेत. या अंतर्गत मेडिकलमध्ये ओटीसी कॅटगरीतील औषधे तेव्हाच विकली जाऊ शकतात, जेव्हा त्याचा कालावधी 5 दिवसांपेक्षा जास्त नसेल. तसेच, पाच दिवस औषध घेऊनही रुग्णाला आराम मिळत नसेल, तर रुग्णाने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. प्रत्येक पॅकमध्ये रुग्णासाठी आवश्यक माहिती असावी आणि पॅकचा आकार 5 दिवसांच्या डोसपेक्षा जास्त नसावा. 

दरम्यान, या प्रक्रियेदरम्यान ओटीसी औषधांची व्याख्या अद्याप ठरलेली नाही. याशिवाय, ओरल डिहायड्रेशन सारख्या औषधांचा सुरुवातीच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही.

Web Title: government proposes sale of 16 commonly used medicines without doctor prescription

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.