कोल्ह्याला द्राक्ष भलेही आंबट असतील पण आपल्या पाचनतंत्रासाठी द्राक्ष ही आरोग्यवर्धकच-संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 03:58 PM2021-11-23T15:58:27+5:302021-11-23T16:00:48+5:30

यूसीएलए (UCLA) म्हणजेच कॅलिफोर्निया विद्यापीठ लॉस एंजेलिस च्या नवीन अभ्यासानुसार, एक असे फळ आहे, जे आतड्याच्या आरोग्यासाठी प्रभावी मानले गेले आहे.

grapes are extremely beneficial for intestine and gut health | कोल्ह्याला द्राक्ष भलेही आंबट असतील पण आपल्या पाचनतंत्रासाठी द्राक्ष ही आरोग्यवर्धकच-संशोधन

कोल्ह्याला द्राक्ष भलेही आंबट असतील पण आपल्या पाचनतंत्रासाठी द्राक्ष ही आरोग्यवर्धकच-संशोधन

googlenewsNext

सध्याचे आयुर्वेदिक तज्ज्ञ बऱ्याच काळापासून पचनसंस्थेची स्थिती (Digestive System) आपल्या एकूण आरोग्यावर कसा परिणाम करते हे सांगत आहेत. जगभरातील अभ्यास आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी हा दावा सिद्ध केला आहे. जोपर्यंत त्याच्या जीवाणूंची पातळी बिघडत नाही तोपर्यंत, आतड्याचे आरोग्य (Gut Health) एकूण आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे, हे आपल्या लक्षात येत नाही.

तंदुरुस्ती असो, पाचक आरोग्य असो किंवा जळजळ होण्याचा धोका असो, आतड्याची (Gut) स्थिती मेंदूशी संवाद साधते, ज्यामुळे शरीराच्या इतर अवयवांवर परिणाम होतो.आतड्यातील जीवाणूंच्या असंतुलनामुळे (Gut bacteria imbalance) पोट आणि आतड्यांमध्ये देखील वेदना जाणवण्याची शक्यता असते.

आहारतज्ज्ञ आणि पोषण तज्ज्ञ (Dietitian and Nutritionist) स्ट्रेस लेव्हल मॅनेज करण्यावर, नियमितपणे व्यायाम करण्यावर आणि आतड्यांचे आरोग्य राखण्यासाठी संतुलित आहाराचे पालन करण्यावर भर देतात. तर आता, यूसीएलए (UCLA) म्हणजेच कॅलिफोर्निया विद्यापीठ लॉस एंजेलिस च्या नवीन अभ्यासानुसार, एक असे फळ आहे, जे आतड्याच्या आरोग्यासाठी प्रभावी मानले गेले आहे.

फायबर युक्त अन्न हे आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे वारंवार सांगितले गेले आहे. हेल्थ जर्नल न्यूट्रिएंट्स मध्ये प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासानुसार, तज्ज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की, एक विशिष्ट फळ आहे, ज्याचा पित्त, अ‍ॅसिड पातळी, कोलेस्ट्रॉल आणि आतड्यांवरील मायक्रोबायोम वर सकारात्मक प्रभाव पडतो. युसीएलएच्या नवीन अभ्यासानुसार, द्राक्ष हे कोलन हेल्थ (Colon Health , केमोथेरपीच्या लक्षणांचा सामना करणे आणि एकूणच आतड्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.

असा झाला अभ्यास
या अभ्यासासाठी, तज्ज्ञांनी चार आठवड्याच्या कालावधीत सहभागींच्या आरोग्यावर द्राक्षांचा कसा प्रभाव होतो, याची तपासणी केली. सहभागींनी दररोज द्राक्षाचे दोन सर्व्हिंग (४६ ग्रॅम) खाण्यासाठी देण्यात आले. चार आठवड्यांनंतर, तज्ज्ञांना सहभागींच्या एलडीएल (खराब) कोलेस्टेरॉलच्या पातळीत ५.९ टक्के घट आणि आतड्याच्या मायक्रोबायोममध्ये सुधारणा दिसून आली. आतड्याच्या आरोग्यासाठी द्राक्षाचे फायदे त्यांच्या उच्च फायबर सामग्री आणि कॅटेचिन - फायटोकेमिकल्समुळे दिसून येतात. जे शरीरात जीवाणूंमध्ये संतुलन निर्माण करतात.

शरीरावर कसा होतो परिणाम ?
युसीएलएने स्पष्ट केल्याप्रमाणे आतड्यातील मायक्रोबायोममधील बदल हे मेटाबॉलिज्म संबंधी विकार, हृदयरोग आणि लठ्ठपणाच्या वाढीव जोखमीशी संबंधित आहेत. तसेच इरिटेबल बोवेल सिंड्रोम आणि ओटीपोटात दुखणे आणि अस्वस्थता देखील वाढू शकते. वैकल्पिकरित्या, निरोगी आतड्यासह रोगप्रतिकार प्रणाली अधिक सुरळीतपणे कार्य करू शकते आणि रोगाचा धोका कमी करू शकते.

संपूर्ण द्राक्षं तसेच अगदी द्राक्षाची पावडर आतड्यांतील मायक्रोबायोम आणि आरोग्यासाठी कशी फायदेशीर ठरू शकतं, यावर देखील या अभ्यासातून प्रकाश टाकण्यात आला आहे. द्राक्षे संपूर्ण शरीरासाठी कसे फायदेशीर ठरू शकतात, यावर अधिक संशोधनाची गरज असली तरी, असे म्हणता येईल, स्वादिष्ट फळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्राक्षांचा आस्वाद कोणीही आनंदाने घेऊ शकतो.

Web Title: grapes are extremely beneficial for intestine and gut health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.