....तर जग कोरोना व्हायरसला कधीच हरवू शकणार नाही; WHO ची धोक्याची सुचना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 11:13 AM2020-06-23T11:13:22+5:302020-06-23T12:39:17+5:30
१० लाख रुग्ण संख्या होण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी लागला. पण आता १० लाख रुग्ण समोर येण्यासाठी ८ दिवसांचा कालावधी पुरेसा आहे.
(image credit- The week)
कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात झपाट्याने वाढत आहे. भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाखांपेक्षा जास्त आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील नेत्यांना कोरोना व्हायरसच्या संकटाच्या काळात राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या लढाईविरुद्ध एकजूटीने काम करण्याचे आवाहन केले आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस एडहॅनम घेब्रियेसुस यांनी सोमवारी सांगतले की, कोरोना माहामारीचा प्रसार वेगाने वाढत आहे. रोज नवीन रुग्णांची संख्या समोर येत आहे.
टेड्रोस यांनी सांगितले की, १० लाख रुग्ण संख्या होण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी लागला. पण आता १० लाख रुग्ण समोर येण्यासाठी ८ दिवसांचा कालावधी पुरेसा आहे. सध्याच्या काळात सगळ्यात मोठा धोका हा कोरोना व्हायरसपासून नाही तर जागतिक स्तरावरील एकजूट कमी असल्यामुळे आहे. एकजूटीचा अभाव असल्यास आपण कोरोनाच्या माहामारीचा सामना करू शकत नाही.
जागतीक स्तरावर माहामारीचा प्रसार वाढत आहे. WHO चे डेविड नेब्ररो यांनी सांगितले की, जगभरातील लोकांना कोरोना व्हायरसची लस मिळण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागू शकतो. जर या वर्षाच्या शेवटापर्यंत लस यशस्वीरित्या तयार झाली तरी सुरक्षा आणि लसीबाबात अन्य तपासण्या करण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यानंतर मोठ्या प्रमाणात लस तयार करण्याचेही आव्हान ठरणार आहे. कोविड 19 चा वाढता प्रसार हा टेस्टिंगचे प्रमाण वाढवल्यामुळे होत आहे असं म्हणता येणार नाही. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता व्हायरस आता जगभरात व्हायरस तळ ठोकून बसला आहे.
सध्या कोरोना रुग्णांच्या बचावासाठी गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. लॉकडाऊन शिथिल करून देशातील जनजीवन आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सरु असतानाच बाधितांची संख्या वाढत चालल्याने नागरिकांच्या चिंतेतही भर पडत आहे. याआधीही जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेसिस यांनी कोरोना साथ पुन्हा मोठ्या प्रमाणावर फैलावण्याचा धोका असल्याने सर्व देश व तेथील नागरिकांनी अतिशय सावध राहिले पाहिजे. अशी माहिती दिली होती.
दिलासादायक! भारतातील 'ही' कंपनी तयार करणार कोविड 19 चे जेनेरिक औषध
कोरोनाच्या माहामारीत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांपासून 'असा' करा बचाव; जाणून घ्या उपाय