कम्प्युटर स्क्रिनवर हिरव्या रंगाचं फिल्टर डिस्लेक्सिया ग्रस्त मुलांसाठी फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 09:48 AM2018-10-24T09:48:31+5:302018-10-24T09:48:48+5:30

कम्प्युटर स्क्रिनवर हिरव्या रंगाचं फिल्टर लावल्यास डिस्लेक्सियाने ग्रस्त मुला-मुलींच्या अभ्यासाची गती वाढवण्याची मदत मिळू शकते.

Green filters on the computer screen can be helpful for children with dyslexia | कम्प्युटर स्क्रिनवर हिरव्या रंगाचं फिल्टर डिस्लेक्सिया ग्रस्त मुलांसाठी फायदेशीर!

कम्प्युटर स्क्रिनवर हिरव्या रंगाचं फिल्टर डिस्लेक्सिया ग्रस्त मुलांसाठी फायदेशीर!

googlenewsNext

कम्प्युटर स्क्रिनवर हिरव्या रंगाचं फिल्टर लावल्यास डिस्लेक्सियाने ग्रस्त मुला-मुलींच्या अभ्यासाची गती वाढवण्याची मदत मिळू शकते. लिहीण्या-वाचण्यात येणाऱ्या अडचणींनी ग्रस्त मुलांसाठी वेगवेगळ्या रंगाच्या फिल्टरचं पेटेंट १९८३ मध्ये करण्यात आलं होतं. हे ऑटिज्म आणि लक्ष केंद्रीत करण्यात अडचण येणाऱ्या मुलांवर वापरलेही गेले होते. 

पॅरिस डाइडरॉट विश्वविद्यालयात शोध करण्याऱ्या मिलेना रजुक म्हणाल्या की,'आम्ही पहिल्यांदाच फार कठोर पद्धतीचा वापर केला'. 

पॅरिसच्या एका रुग्णालयात अभ्यासासाठी डिस्लेक्सियाने ग्रस्त १८ मुलांना आणि डिस्लेक्सिया नसलेल्या १८ मुलांची निवड करण्यात आली होती. अभ्यासकांनी या अभ्यासासाठी पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या फिल्टरचा वापर करण्याचा निर्णय घेतला. 

ब्राझील येथील साओ पाउलो स्टेट यूनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जोस एंजेलो बरेला म्हणाले की, 'डिस्लेक्सियाने ग्रस्त लहान मुलांना वाक्य समजण्यासाठी फार जास्त वेळ शब्दांवर लक्ष द्यावं लागतं. यामुळे त्यांची वाचण्याची गती कमी होते'.

फिल्टर्सचा डिस्लेक्सिया नसलेल्या मुलांच्या अभ्यासाच्या गतीवर काहीही परिणाम होत नाही. पण डिस्लेक्सिया असलेल्या मुलांवर याचा प्रभाव होतो. हिरव्या रंगाचं फिल्टर लावलेल्या कम्प्युटरवर त्यांनी वेगाने वाचन केलं. 

काय आहे डिस्लेक्सिया?

डिस्लेक्सिया एक लिहीण्या-वाचण्यासंबंधी समस्या आहे. यात मुलांना अक्षरं ओळखणे, वाचणे आणि त्यांचा उच्चार करणे या समस्या होतात. डिस्लेक्सिया असलेले मुलं बोलण्यातील आणि लिखित शब्दांना पाठ करु शकत नाहीत. डिस्लेक्सिया झाल्याचा अर्थ म्हणजे तुमच्या मुलांची शिकण्याची क्षमता कमी आहे, असा होत नाही. पण चांगल्याप्रकारे शिकण्यात सक्षम नसल्याने त्यांनी काही अडचणींचा सामना करावा लागतो. 

भारतात डिस्लेक्सिया हा आजार १५ टक्के असल्याचं अंदाज लावला जातो. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, जानेवारी २०१३ मध्ये जवळपास २३ कोटी लहान मुलं-मुली मान्यता प्राप्त शाळेत होते. १५ टक्क्याच्या हिशोबाने विचार केला तर भारतात डिस्लेक्सिया असलेल्या मुलांची संख्या जवळपास ३.५ कोटी असू शकते. 
 

Web Title: Green filters on the computer screen can be helpful for children with dyslexia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.