फॅटी लिव्हर आणि कॅन्सरपासून बचावासाठी मदत करतात हिरव्या पालेभाज्या - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 11:30 AM2018-12-23T11:30:13+5:302018-12-23T11:32:15+5:30

आपल्या शरीरातील सर्व अवयवांप्रमाणेच शरीराचं कार्य सुरळीत राहण्यासाठी लिव्हर फार महत्त्वाचं कार्य पार पाडतं. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणं, पचनप्रक्रीया सुरळीत होणं, रक्त शुद्ध करण्यासाठी त्याचप्रमाणे डिटॉक्सीफिकेशन करण्याचं काम लिव्हर करतं.

Green leafy vegetables reduce risk of fatty liver | फॅटी लिव्हर आणि कॅन्सरपासून बचावासाठी मदत करतात हिरव्या पालेभाज्या - रिसर्च

फॅटी लिव्हर आणि कॅन्सरपासून बचावासाठी मदत करतात हिरव्या पालेभाज्या - रिसर्च

Next

आपल्या शरीरातील सर्व अवयवांप्रमाणेच शरीराचं कार्य सुरळीत राहण्यासाठी लिव्हर फार महत्त्वाचं कार्य पार पाडतं. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणं, पचनप्रक्रीया सुरळीत होणं, रक्त शुद्ध करण्यासाठी त्याचप्रमाणे डिटॉक्सीफिकेशन करण्याचं काम लिव्हर करतं. सध्याच्या धावपळीच्या आणि बदललेल्या जीवनशैलीमध्ये आरोग्याचा निरनिराळ्या रोगांपासून बचाव करण्यासाठी लिव्हर फार महत्त्वाची भूमिका बजावतं. पण अनेकदा अनेक लोकांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या दिसून येते. पण आता लिव्हरच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या उपयुक्त ठरतात, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. 

जेवणामध्ये मुबलक प्रमाणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या कमी होण्याचा धोका कमी होतो. ही बाब उंदरांवर करण्यात आलेल्या एका संशोधनातून सिद्ध झाली आहे. फॅटी लिव्हर अनेक व्यक्तीमध्ये आढळून येणारा एक साधारण आजार आहे. परंतु या आजाराकडे दुर्लक्ष केलं तर याचं रूपांतर लिव्हर फेल्यु लिव्हर सिरॉसिस आणि लिव्हर कॅन्सरसारख्या आजारांमध्ये होऊ शकतं. 

लिव्हर संदर्भातील या गंभीर आजारांचं सर्वात मोठं कारण म्हणजे लठ्ठपणा आणि मद्यपान करणं. हिरव्या पालेभाज्यांमध्ये इनऑर्गेनिक नायट्रेट असतं जे की, लिव्हरमध्ये फॅट जमा करण्यापासून रोखण्यास मदत करतं. स्वीडनचे असिस्टंट प्रोफेसर कार्लस्ट्रॉम यांनी सांगितले की, 'आम्ही ज्यावेळी उंदराला चरबीयुक्त आणि शुगर वेस्टर डाएट दिलं आणि त्याचवेळी त्यासोबत डायटरी नायट्रेटदेखील दिलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की, त्यांच्या लिव्हरमध्ये कमी फॅट जमा झालं आहे.'

उंदरांवर करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार ही गोष्ट समोर आली की, फळं आणि भाज्यांचं जास्त प्रमाणात सेवन करणं कार्डियोवॅस्कुलर फंक्शन आणि डायबिटीजसाठी फायदेशीर ठरतं. हिरव्या पालेभाज्या आणि फळं उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठीही उपयोगी ठरतात. तसेच ग्लुकोजमध्ये इन्सुलिनची पातळी वाढविण्याचे कामही करतात. 

फॅटी लिव्हर डिजीजवर अद्याप कोणताही ठोस उपचार पद्धती अस्तित्वात नाही. त्यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष केलं तर लिव्हर सिरॉसिस आणि लिव्हर कॅन्सरसारख्या अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. 

लिव्हर फेल्युअरची समस्या होण्याची कारणं :

- दूषित अन्न आणि पाण्याचं सेवन करणं

- मसालेदार आणि चटपटीत पदार्थांचं सेवन करणं

- शरीरात 'व्हिटॅमिन-बी' ची कमतरता असणं

- अॅन्टी-बायोटिक्सचं अति सेवन 

- मलेरिया आणि टायफाइड

- चहा, कॉफी, जंक फूड इत्यादी पदार्थांचं अति सेवन

- सिगरेट, दारू यांसारखी व्यसनं करणं

- 6 तासांपेक्षा कमी झोप घेणं

Web Title: Green leafy vegetables reduce risk of fatty liver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.