हाय कोलेस्ट्रॉल कमी करते ग्रीन टी, पण सेवन करताना 'या' चुका टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 09:44 AM2024-02-13T09:44:26+5:302024-02-13T09:45:25+5:30

Green tea Benefits : जर वेळीच वाढत असलेलं कोलेस्ट्रॉल कमी केलं नाही तर हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि इतर आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात.

Green tea to reduce high cholesterol level naturally | हाय कोलेस्ट्रॉल कमी करते ग्रीन टी, पण सेवन करताना 'या' चुका टाळा!

हाय कोलेस्ट्रॉल कमी करते ग्रीन टी, पण सेवन करताना 'या' चुका टाळा!

Green tea Benefits :  आजकाल बऱ्याच लोकांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या होत आहे. याला कारण चुकीची लाइफस्टाईल, फिजिकल अ‍ॅक्टिविटी न करणं आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी. जर वेळीच वाढत असलेलं कोलेस्ट्रॉल कमी केलं नाही तर हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि इतर आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात. अशात एक्सपर्ट्स वेगवेगळे उपाय सांगत असतात, यातीलच एक उपाय म्हणजे ग्रीन टी.

ग्रीन टी मधील तत्व

ग्रीन टीमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, मॅगनीज, पोटॅशिअम, कॉपर, आयर्न, रायबोफ्लेविन, थायमीन, पॉलीफेनॉल व अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्स भरपूर असतात. ज्यामुळे याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. चला जाणून घेऊ ग्रीन टी कोलेस्ट्रॉल लेव्हल सुधारण्यास कशी मदत करते.

अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स

एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, ग्रीन टी मध्ये कॅटेचिन नावाचे अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतात, जे एलडीएल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल ऑक्सीकरण कमी करण्यासोबतच धमण्यांमध्ये प्लाक तयार होण्यापासून रोखण्यासाठी प्रभावी मानले जातात. यामुळे नियमितपणे ग्रीन टी चं सेवन करा.

सूज कमी होते

धमण्यांमध्ये प्लाक जमा होण्याचं एक कारण म्हणजे इन्फ्लामेशन म्हणजे सूज मानलं जातं. ग्रीन टी मध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी तत्व असतात जे शरीरातील आतील सूज कमी करण्यासोबत हाय कोलेस्ट्रॉल लेव्हलचा आर्टरीवर वाईट प्रभाव पडू देत नाहीत.

या गोष्टींची घ्या काळजी

1)  ग्रीन टीमुळे जरी वजन कमी होत असले तरी तिचे सेवन दिवसातून किती वेळा करावे याबद्दल डॉक्टरांकडून सल्ला घ्या. दिवसातून केवळ एकदा ग्रीन टी पिणे फायद्याचे ठरेल, असे सांगितले जाते.

2) ग्रीन टी वारंवार उकडू नका. एकदा ग्रीन टी बनवल्यानंतर लगेचच तिचे सेवन करा. ती जास्त वेळ तशीच ठेवून देऊ नका किंवा बरीच आधी बनवलेली ग्रीन टी घेऊ नका.

3) ग्रीन टीची चव काहींना आवडते तर काहींना नाही. त्यामुळे तिला अधिक चांगली चव येण्यासाठी अनेक जण त्यात साखर किंवा गूळ टाकतात. पण असे केल्याने त्यातले पोषक तत्वे कमी होतात. त्यामुळे कधीच त्यात साखर किंवा कोणताही गोड पदार्थ टाकू नका.

4) ग्रीन टीचे प्रकार वेगवेगळे आहे. तुळस, लिंबू, पुदीना, जॅस्मिन अशा वेगवेगळ्या प्रकारात ग्रीन टी उपलब्ध आहे. या प्रत्येक प्रकाराचे फायदेही वेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की कोणत्या आरोग्याच्या समस्येसाठी त्याचे सेवन करत आहात हे देखील जाणून घ्या.

Web Title: Green tea to reduce high cholesterol level naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.