पावसाळ्यात आरोग्याला जपा

By Admin | Published: June 8, 2017 02:32 AM2017-06-08T02:32:31+5:302017-06-08T02:32:31+5:30

उन्हाळ्याचे चटके सहन करून आता कुठे पावसाचा शिडकावा सुरू झाला नाही, की लगेचच प्रत्येक घरात आरोग्यविषयक कुरबुरी ऐकू येतात.

Guard in the rainy season | पावसाळ्यात आरोग्याला जपा

पावसाळ्यात आरोग्याला जपा

googlenewsNext

- डॉ.माधुरी पिसे, फिजिशिअन
उन्हाळ्याचे चटके सहन करून आता कुठे पावसाचा शिडकावा सुरू झाला नाही, की लगेचच प्रत्येक घरात आरोग्यविषयक कुरबुरी ऐकू येतात. प्रत्येक घरातील ‘आई’ सतत हे खाऊ नको, पावसात भिजू नको, थंड पेय नकोच.. असे सतत सांगत असते. त्यामुळे आता पावसाला ‘वेलकम’ करून स्वत:ची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स...
पावसाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्वचा ओली राहिल्यामुळे हानी होऊ शकते. डोक्यापासून ते पायापर्यंत त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. फंगल इन्फेक्शन, स्केबीज इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते. ओले शूज पायात ठेवल्यामुळे पायाला खाज येणे, रॅशेस तसेच फंगल्स इन्फेक्शन होऊ शकते. याचा जास्त करून पुरुषांना त्रास होतो. स्त्रियांमध्ये स्तनाच्या खाली डाग येणे, काखेत डार्क सर्कल येणे असा ओलेपणामुळे त्रास होऊ शकतो.
त्वचा कोरडी असेल तर ती आणखी कोरडी होऊ शकते. तसेच तेलकट त्वचा असल्यास ती अधिक तेलकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिंपल्स येऊ शकतात. ओलेपणामुळे पुरळ येण्याने त्वचेला विविध प्रकारची हानी होऊ शकते. पावसाळ्यात त्वतेची ह्युमिनिटी कमी होते. केसात कोंडाही जास्त होता. त्यांचे इन्फेक्शन कपाळावर होऊ शकते; तसेच केस चिकट होणे, केसात खाज येणे असे प्रकार होऊ शकतात. यासाठी आठवड्यात दोनदा ते तीनदा केस धुणे आवश्यक आहे.
ओले राहू नये, कपडे बदलावे, आॅफिसमध्ये चपलांचे वेगळे जोड वापरावे. त्यामुळे पायांवर त्वचेचे विकार होणार नाहीत. जास्तीतजास्त सुती कपडे वापरावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने अ‍ॅन्टीडस्टी फंगल पावडर वापरावी. तसेच त्वचेवर काही अ‍ॅलर्जी उठल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवावे.
पावसाळ्यात वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे डोळ्यांना इजा होऊ शकते; तसेच इन्फेक्शन होऊ शकते. डोळ्यांना अधिक त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यांत ड्रॉप टाकावेत. या काळात आपली पचन संस्था खूप नाजूक असते. त्यामुळे आपण जे खाऊ ते पचण्यास वेळ लागतो. त्यामुळे पोट बिघडणे, उलट्यांसारखे प्रकार जास्त प्रमाणात होत असतात. व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. आजारपण वाढते. दूषित पाण्यामुळेही अनेक आजार उद्भवत असतात. दहीपुरी, शेवपुरी, पाणीपुरी, भेळ यांसारखे पदार्थ खाणे टाळावे. पाणी उकळून प्यावे. सॅलेड, फळ यांचा आहारात समावेश असावा.
पावसाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्वचा ओली राहिल्यामुळे हानी होऊ शकते. डोक्यापासून ते पायापर्यंत त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. फंगल इन्फेक्शन, स्केबीज इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते. ओले शूज पायात ठेवल्यामुळे पायाला खाज येणे, रॅशेस तसेच फंगल्स इन्फेक्शन होऊ शकते.

Web Title: Guard in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.