पोटातील गॅस दूर करण्यासाठी फायदेशीर आहे हे फळ, जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 09:33 AM2022-12-03T09:33:59+5:302022-12-03T09:34:22+5:30

Guava For Digestion and Gastritis: जेव्हाही पचन तंत्र प्रभावित होतं याचा तंत्र प्रभाव आपल्या रोजच्या जीवनावर होतो. आपण सामान्य कामही नेहमीसारखं करू शकत नाही आणि दिवसभर त्रास होत राहतो.

Guava benefits for digestion constipation gastritis best fruit for stomach problem | पोटातील गॅस दूर करण्यासाठी फायदेशीर आहे हे फळ, जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ

पोटातील गॅस दूर करण्यासाठी फायदेशीर आहे हे फळ, जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ

googlenewsNext

Guava For Digestion and Gastritis: आजकाल लग्न असो वा डेली लाइफ प्रमाणापेक्षा जास्त ऑयली फूड खाण्याची सगळ्यांनाच सवयी लागली आहे. पण त्यामुळे पोटात गडबड सुरू होते आणि नंतर गॅस, बद्धकोष्ठता, अपचन अशा समस्या होऊ लागतात. जेव्हाही पचन तंत्र प्रभावित होतं याचा तंत्र प्रभाव आपल्या रोजच्या जीवनावर होतो. आपण सामान्य कामही नेहमीसारखं करू शकत नाही आणि दिवसभर त्रास होत राहतो. अशात यावर सोपा शोधणं गरजेचं असतं.

पोटासाठी औषध आहे पेरू

प्रसिद्ध डायटिशिअन आयुषी यादव (Ayushi Yadav) यांनी सांगितलं की, पोटात काही गडबड असेल तर त्यावर पेरू हे सगळ्यात चांगलं औषध आहे. या फळामध्ये इतके पोषक तत्व असतात की, ज्यांनी गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यात फाइबर, प्रोटीन, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतं. चला जाणून घेऊ याचे फायदे...

1) गॅसची समस्या होते दूर

ज्या लोकांना गॅस आणि अॅसिडिटीची समस्या आहे त्यांच्यासाठी पेरू नेहमीच्या डाएटचा भाग असला पाहिजे. कारण याने पोटात एअर बॅलन्स राहते आणि गॅस शरीरातून बाहेर येण्यास जास्त समस्या होत नाही. पेरू नियमितपणे खाल्ल्याने पोटही साफ होतं.

2) बद्धकोष्ठतेपासून मिळणार सुटका

बद्धकोष्ठता ही तर तशी सामान्य समस्या वाटते. फण अनेक गंभीर आजारांचा मूळही आहे. त्यामुळे ही समस्या वेळीच ठीक केली पाहिजे. अशात रोज पेरूचं सेवन करावं. काही दिवसातच याचा परिणाम दिसून येईल. पेरूमध्ये फायबर भरपूर असतं. ज्यामुळे डायजेशनमध्ये सुधारणा होते.

पेरू खाण्याची योग्य वेळ कोणती

आता तुम्हाला पेरूचे फायदे तर माहीत झालेच आहेत. आता पेरू खाण्याची योग्य कोणती याबाबतही जाणून घ्या. आयुषी यादव यांच्यानुसार, पेरू तुम्ही दुपारचं जेवण केल्यावर 30 मिनिटांनी खाऊ शकता. याने तुम्हाला पोटासंबंध समस्या होणार नाहीत.

Web Title: Guava benefits for digestion constipation gastritis best fruit for stomach problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.