गुल पनागला लागलंय 'या' गोष्टीचं व्यसन, बाहेर पडण्यासाठी करतीये धडपड!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 11:23 AM2018-10-03T11:23:47+5:302018-10-03T11:24:30+5:30
अभिनेत्री गुल पनागला एका गोष्टीचं व्यसन लागलं असून यातून बाहेर पडण्यासाठी ती धडपड करत आहे.
(Image Credit : elle.in)
स्मार्टफोन गरज राहिलेली नसून व्यसन झालेलं आहे, असं म्हणताना कुणाला ना कुणाला तुम्ही ऐकलं असेल. या व्यसनाने अभिनेत्री गुल पनागही हैराण झाली आहे. फोनच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत असल्याचं तिने स्वत: इन्स्टाग्रामवर सांगितलं. या फोटोतही ती फोनसोबत दिसत आहे.
या फोटोसोबत तिने एक कॅप्शन लिहिले असून त्यात ती म्हणाली आहे की, 'फोनच्या व्यसनातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत आहे. सर्वात पहिलं पाऊल हे आहे की, काय याची तुम्हाला व्यसन लागलंय? काय तुम्हाला फोनचं व्यसन लागलंय?'.
काय सांगतात रिसर्च
एक रिसर्चनुसार, मोबाईल हॅडसेट हा पर्यावरण आणि आपल्या आरोग्यासाठी फार मोठा धोका ठरत आहे. मोबाईल फोन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनामुळे आणि धातूंमुळे माती, पाणी आणि हवेमध्ये विषारी पदार्थ मिश्रित होत आहेत. हे रसायन आणि धातू अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतात.
वाढू शकतो तणाव
फोनचं व्यसन हे ड्रग्सच्या व्यसनापेक्षा कमी नाहीये. फोनचा गरजेपेक्षा जास्त वापर शरीरावर वाईट प्रभाव टाकतो. याचं स्पष्टीकरण अनेक शोधांमधून देण्यात आलं आहे. स्वीडनमध्ये करण्यात आलेल्या एका शोधानुसार. फोनच्या व्यसनामुळे तणावही वाढू शकतो. खासकरुन महिलांमध्ये तणावांचं हेच प्रमुख कारण आहे. रात्री झोपण्यापूर्वी फोनचा वापर केल्याने झोप खराब होऊ शकते.
डोळ्यांवर होतो वाईट परिणाम
फोनचा सतत वापर केल्याने डोळ्यांवर वाईट परिणाम होतात. फोनची स्क्रीन कम्प्युटरच्या स्क्रीनपेक्षा लहान असते. याकारणाने त्यातील काहीही वाचताना डोळ्यांना त्रास होतो. फोनमधून निघणारे रेडिएशन शरीरावर नकारात्मक प्रभाव करतात. २०१३ मध्ये झालेल्या एका शोधानुसार, फोनच्या अधिक वापराने रक्तदाबही वाढतो. अशात तुम्ही हृदयरोगाने ग्रस्त होऊ शतकता. तसेच याने ऐकण्याच्या क्षमतेवरही प्रभाव पडतो.