Gular Benefits: 5 गंभीर आजारांना दूर करण्यास मदत करतं हे फळ, आयुर्वेदात आहे फार महत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 10:57 AM2023-04-29T10:57:42+5:302023-04-29T10:58:36+5:30
Gular Tree Benefits: उंबराचं झाड एक औषधी झाड मानलं जातं. उंबरांवर करण्यात आलेल्या शोधात सांगण्यात आलं आहे की, यात अॅंटी-पायरेटीक, अॅंटी इन्फ्लामेटरी, अॅंटी-मायक्रोबियल, अॅंटी-डायबिटीक इत्यादी गुण असतात.
Gular Tree Benefits: कोणताही आजार हा सांगून येत नाही. तर 5 असे गंभीर आजार आहेत जे एकदा झाले तर लवकर बरे होत नाहीत. या आजारांवर उपचार करण्यासाठी पाण्यासारखा पैसा लावावा लागतो. पण आयुर्वेद या गंभीर आजारांचा उपाय म्हणून उंबरांकडे बघतं. याचा दावा काही शोधांमध्येही करण्यात आला आहे.
उंबराचे फायदे
उंबराचं झाड एक औषधी झाड मानलं जातं. उंबरांवर करण्यात आलेल्या शोधात सांगण्यात आलं आहे की, यात अॅंटी-पायरेटीक, अॅंटी इन्फ्लामेटरी, अॅंटी-मायक्रोबियल, अॅंटी-डायबिटीक इत्यादी गुण असतात. उंबराची डायबिटीस, लिव्हर डिसऑर्डर, पाइल्स, डायरिया आणि फुप्फुसासारख्या गंभीर आजारात मदत होते.
डायबिटीसचा देशी उपचार
काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, उंबराचं झाड ब्लड ग्लूकोज कमी करण्यास मदत करतं. डायबिटीसचे रूग्ण वजन कंट्रोल करण्यासाठीही याचा वापर करू शकतात. पण ठोस पुराव्यांसाठी यावर आणखी शोध होणं बाकी आहे.
लिव्हर डिसऑर्डर
आयुर्वेदात उंबराला लिव्हरचा आजार ठीक करण्यासाठी वापरलं जातं. याच्या पानांच्या रसात लिव्हर डॅमेज कमी करण्याचे गुण असतात. लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
पाइल्सवर उपाय
पाइल्समध्ये मलद्वारांच्या नसांमध्ये सूज येते. ही समस्या गंभीर झाली तर त्यातून रक्तही येऊ शकतं. पण उंबरातील अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण या आजाराला दूर करण्यास मदत करतात.
डायरिया
अभ्यासकांनी डायरियाच्या समस्येत उंबरांची भूमिका जाणून घेण्यासाठी रिसर्च केला. त्यांनी मुद्दामहून आधी डायरियाची समस्या निर्माण केली आणि नंतर उंबराच्या पानांच्या रसाचा वापर केला. याचे परिणाम सकारात्मक आणि डायरियापासून आराम देणारे मिळाले.
फुप्फुसाची समस्या
रेस्पिरेटरीमध्ये इन्फेक्शन झाल्यावर खोकला, श्वास भरून येणे, श्वास घेताना शिटी वाजल्यासारखा आवाज येणे यांसारखी लक्षण दिसतात. ही लक्षणं मॅनेज करण्यात उंबरांची मदत मिळते. याच्या वापरासाठी एखाद्या आयुर्वेदिक एक्सपर्टची मदत घेऊ शकता.