ब्रश करताना ही समस्या झाली तर तुम्हाला असू शकतो फॅटी लिव्हर डिजीज, वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 09:29 AM2023-03-01T09:29:35+5:302023-03-01T09:32:02+5:30
Sign of fatty liver disease: सिरोसिस फॅटी लिव्हर डिजीजची सगळ्यात गंभीर स्थिती आहे. ही स्थिती लिव्हरवर अनेक वर्ष सूज राहिल्यानंतर येते. ज्यामुळे लिव्हरवर गाठ तयार होते.
Sign of fatty liver disease: फॅटी लिव्हर डिजीज (Fatty liver disease) एक अशी समस्या आहे ज्यात व्यक्तीच्या लिव्हरवर फॅट जमा होतं. यात लिव्हरचा आकार वाढू लागतो. ही समस्या त्या लोकांमध्ये अधिक बघायला मिळते जे अधिक मद्यसेवन करतात किंवा ज्यांचं वजन जास्त आहे. पण आजार इतरांनाही होऊ शकतो. या आजाराचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस (Alcoholic liver cirrhosis) जो दारूमुळे होतो आणि दुसरा म्हणजे नॉन-अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस (Non-alcoholic liver cirrhosis) जो जास्त वजनामुळे होतो.
सिरोसिस फॅटी लिव्हर डिजीजची सगळ्यात गंभीर स्थिती आहे. ही स्थिती लिव्हरवर अनेक वर्ष सूज राहिल्यानंतर येते. ज्यामुळे लिव्हरवर गाठ तयार होते. जास्त काळ लिव्हर खराब राहिल्याने लिव्हरमध्ये हेल्दी टिश्यू ऐवजी डॅमेज टिश्यू तयार होतात. यामुळे लिव्हर बरोबर काम करत नाही. सिरोसिसमुळे होणारं डॅमेज पुढे जाऊन लिव्हर फेलिअरचं कारण बनतं. आज आम्ही तुम्हाला काही संकेत सांगणार आहोत, जे याकडे इशारा करतात की, तुम्हाला फॅटी लिव्हर डिजीज आहे.
हिरड्यांमधून रक्त
दात ब्रश करताना जर हिरड्यांमधून सहजपणे रक्त येत असेल तर हा याचा संकेत असू शकतो की, तुम्ही फॅटी लिव्हरचा आजार आहे. कारण हा आजार रक्त वाहण्याचं किंवा सहजपणे जखम होण्याचं कारण ठरू शकतो. त्याशिवाय सतत नाकातून रक्त येणंही फॅटी लिव्हर डिजीजचा संकेत होऊ शकतो. नॉन-अल्कोहलिक लिव्हर सिरोसिसचा दात तुटणे आणि पेरियोडोंटायटिससोबतही संबंध आहे. हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करून हा आजार अधिक वाढण्यापासून रोखू शकता.
फॅटी लिव्हर डिजीजची इतर लक्षण
थकवा - सामान्यपणे फॅटी लिव्हर डिजीजच्या रूग्णांना सतत थकवा जाणवतो.
त्वचेवर पिवळेपणा - फॅटी लिव्हरमुळे त्वचा आणि नसांमध्ये पिवळेपणा किंवा पांढरेपणा दिसू शकतो.
पोटात वेदना - फॅटी लिव्हर डिजीज असलेल्या लोकांना पोटात दुखण्याची समस्या होऊ शकते.
उलटी - हा आजार असलेल्या लोकांना अनेकदा उलटीचा अनुभव येऊ शकतो.
तिळ-चट्टे - फॅटी लिव्हर डिजीजच्या रूग्णांमध्ये त्वचेवर तिळ-चट्टे, खाजही येऊ शकते.
अपचन - फॅटी लिव्हर डिजीजच्या रूग्णांना अपचन, हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीससारख्या समस्याही होऊ शकतात.