कोरोना लस H3N2 व्हायरसवर प्रभावी ठरणार?; डॉक्टरांनी सांगितलं 'या' लोकांना सर्वाधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 12:57 PM2023-03-14T12:57:22+5:302023-03-14T12:58:24+5:30

H3N2 पासून संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे जेणेकरून त्याचा प्रसार रोखता येईल.

h3n2 virus covid19 vaccine effective against influenza or not risk spread life threatening signs symptoms | कोरोना लस H3N2 व्हायरसवर प्रभावी ठरणार?; डॉक्टरांनी सांगितलं 'या' लोकांना सर्वाधिक धोका

कोरोना लस H3N2 व्हायरसवर प्रभावी ठरणार?; डॉक्टरांनी सांगितलं 'या' लोकांना सर्वाधिक धोका

googlenewsNext

कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना आता नवीन व्हायरसची प्रकरणं आता वाढू लागली आहेत. या नव्या व्हायरसचं नाव H3N2 असून तो इन्फ्लुएंझा ए व्हायरसचा उपप्रकार आहे. या व्हायरसची लागण झाल्यानंतर, फ्लू सारखी लक्षणे जसं की ताप, श्वास घेण्यास त्रास, थकवा आणि खोकला रुग्णामध्ये दिसून येतो, जो तीन आठवडे टिकतो. या व्हायरसबाबत सर्व राज्यांना एडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की H3N2 पासून संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे जेणेकरून त्याचा प्रसार रोखता येईल.

कोरोना महामारीला तीन वर्षे लोटल्यानंतर लोकांच्या मनात या व्हायरसबाबत अनेक प्रश्न आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी दिलेल्या लसी H3N2 व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी आहेत की नाही? हा प्रश्न पडला आहे. याबाबत आता डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. डॉ. कुलदीप कुमार ग्रोवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "नाही, असे होणार नाही कारण कोविड-19 आणि H3N2 व्हायरस हे दोन्ही एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. व्हायरसचे स्वरूप, प्रसाराची वारंवारता इ.च्या आधारावर लस तयार केली जाते." 

अशी घ्या काळजी

"कोविड-19 आणि H3N2 व्हायरसचे स्वरूप आणि वारंवारता भिन्न आहे म्हणून कोरोना लस या इन्फ्लूएंझा व्हायरसपासून संरक्षण करण्यास मदत करणार नाही." राकेश मिश्रा यांनी "इतर कोणत्याही व्हायरसप्रमाणेच, H3N2 व्हायरस टाळण्यासाठी, योग्य खबरदारी घ्या, मास्क घाला, हात स्वच्छ ठेवा आणि संसर्ग टाळण्यासाठी वारंवार चेहरा-डोळ्यांना स्पर्श करणे टाळा. लोकांनी मास्क घालणे बंद केले पण मास्क घाला. मास्क फ्लूचा प्रसार रोखू शकतो आणि हानिकारक कणांना शरीरात जाण्यापासून रोखू शकतो म्हणून मास्क घाला.

'या' लोकांना सर्वाधिक धोका

डॉ. कुलदीप कुमार ग्रोव्हर यांच्या मते, "मुले आणि वृद्धांना H3N2 व्हायरसचा धोका जास्त असतो कारण तो रोगप्रतिकारशक्तीवर हल्ला करतो. ज्या लोकांना दमा, हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा आणि कमकुवत प्रतिकारशक्तीच्या तक्रारी असतात त्यांनाही जास्त धोका असतो. गर्भवती महिलांनाही या व्हायरसचा धोका जास्त आहे. कोविडमुळे मुले 2 वर्षे घरातच राहिली आणि ते शाळा आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहिले.परंतु आता शाळा उघडल्या आहेत आणि बाजारपेठेतही गर्दी वाढली आहे. या प्रकारामुळे मुलांमध्ये व्हायरसची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: h3n2 virus covid19 vaccine effective against influenza or not risk spread life threatening signs symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.