बापरे! जास्त पाणी प्याल तर कोमात जाल, तज्ज्ञांचा सल्ला; 24 तासांत इतकंच प्या, दिसतात हे 7 संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 04:45 PM2023-04-13T16:45:09+5:302023-04-13T16:47:02+5:30

उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र या काळात जास्त पाणी पिणेही टाळावे.

habits of drinking excessive water can cause coma know side effects of drinking too much water | बापरे! जास्त पाणी प्याल तर कोमात जाल, तज्ज्ञांचा सल्ला; 24 तासांत इतकंच प्या, दिसतात हे 7 संकेत

बापरे! जास्त पाणी प्याल तर कोमात जाल, तज्ज्ञांचा सल्ला; 24 तासांत इतकंच प्या, दिसतात हे 7 संकेत

googlenewsNext

आपल्या शरीराचा एक मोठा भाग फक्त पाण्याने व्यापलेला असतो. हे डिहायड्रेशनपासून संरक्षण आणि शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम करते. म्हणूनच उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र या काळात जास्त पाणी पिणेही टाळावे.

हेल्थ कोच आणि न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रियंका शेरावत यांनी दररोज किती पाणी पिणे आवश्यक आहे हे सांगितले. जेणेकरून त्याचे कोणतेही दुष्परिणाम टाळता येतील. तहान कशी लागते आणि जास्त पाणी पिण्याची सवय किती घातक ठरू शकते ते जाणून घेऊया.

डॉ. प्रियंका यांनी सांगितले की मेंदूमध्ये एक थ्रस्ट सेंटर आहे. जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा विशिष्ट पेप्टाइड्स स्राव होतात. जे थ्रस्ट सेंटरला सिग्नल देतात की शरीराला पाण्याची गरज आहे आणि तुम्हाला तहान लागली आहे.

तहान न लागता पाणी पिण्याच्या सवयीला सायकोजेनिक पॉलीडिप्सिया म्हणतात. डॉ. प्रियंका यांच्या म्हणण्यानुसार, यामध्ये व्यक्ती तहान न लागता दर 2-5 मिनिटांनी पाणी पिणे सुरू ठेवते. हे शरीरासाठी खूप हानिकारक आहे आणि शरीरातील द्रव पातळी जास्त होते.

Kidney.org (ref.) नुसार, जेव्हा शरीरात जास्त पाणी असते तेव्हा सोडियमची पातळी कमी होते. त्यामुळे पेशींमध्ये जास्त पाणी पोहोचते आणि सूज येते. या स्थितीला हायपोनेट्रेमिया म्हणतात, जी विशेषतः मेंदूसाठी हानिकारक आहे आणि कोमामध्ये पोहचवू शकते.

हायपोनेट्रेमियाची लक्षणे

- मळमळ किंवा उलट्या
- डोकेदुखी किंवा थकवा
- लो ब्लड प्रेशर
- ऊर्जेचा अभाव
- स्नायू कमकुवत 
- चिंता किंवा राग येणे
- कोमा

प्रियांका शेरावत यांनी एका दिवसात किती पाणी लागते हे सांगितले. त्या म्हणाल्या की 24 तासांत 2 ते 3 लीटर पाणी पिणे पुरेसे आहे. तुम्हाला याबाबत काही शंका असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: habits of drinking excessive water can cause coma know side effects of drinking too much water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.