या सवयींमुळे तुम्हाला होऊ शकतो डायबिटीस, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 10:15 AM2022-09-16T10:15:09+5:302022-09-16T10:15:14+5:30
Diabetes Causes : टाइप 2 डायबिटीस तुमच्या चुकीच्या सवयीतून तुम्हाला मिळतो. कोणत्याही आजारापासून वाचण्यासाठी आधी त्याची कारणं जाणून घेणं फार गरजेचं असतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डायबिटीसच्या कारणांबाबत सांगणार आहोत.
Diabetes Causes : भारतात डायबिटीसचा समावेश कॉमन आजारांमध्ये झाला आहे. डायबिटीसच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. डॉक्टर सांगतात की, इतक्या वेगाने डायबिटीसच्या रूग्णांची संख्या वाढण्याचं कारण लोकांची सुस्त लाइफस्टाईल, चुकीचं खाणं-पिणं आणि काही चुकीच्या सवयी आहेत. आकडेवारीनुसार, देशात जवळपास 7.7 कोटी लोक या आजाराने पीडित आहेत आणि ही संख्या दररोज वाढत आहे. टाइप 1 डायबिटीस हा जेनेटिक असतो, जो तुम्हाला परिवाराकडून मिळतो. पण टाइप 2 डायबिटीस तुमच्या चुकीच्या सवयीतून तुम्हाला मिळतो. कोणत्याही आजारापासून वाचण्यासाठी आधी त्याची कारणं जाणून घेणं फार गरजेचं असतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डायबिटीसच्या कारणांबाबत सांगणार आहोत.
सुस्त लाइफस्टाईल
आराम करायला तर सर्वांनाच आवडतं. सगळ्यांना सोफ्यावर किंवा बेडवर लेटून टीव्ही बघावी वाटते किंवा वेबसीरीज बघाव्या वाटतात. पण हा असा जास्त वेळ केलेला आराम तुमच्यासाठी फार नुकसानकारक आहे. जास्त वेळ बसून राहिल्याने किंवा लेटल्याने, कोणतीही शारीरिक हालचाल न केल्याने, फुप्फुसांवर वाईट प्रभाव पडतो. रिसर्चमधून समोर आलं आहे की, टाइप 2 डायबिटीसचा धोका अशा लोकांना जास्त असतो जे लोक दिवसभर बसून राहतात किंवा लेटून राहतात.
हाय कॅलरी आहार
जास्त प्रमाणात कॅलरींचं सेवन केल्याने वजन वाढतं आणि टाइप 2 डायबिटीसचा धोकाही होतो. कोणतीही व्यक्ती दिवसा जेवढं काम करतो तेवढ्याच प्रमाणात कॅलरीचं सेवन केलं पाहिजे. जर एखादी व्यक्ती असं काही काम करतो ज्यात शारीरिक हालचाल नाही. अशांनी कमी कॅलरीचा आहार घेतला पाहिजे.
एक्सरसाइज न करणं
अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, एक्सरसाइज केल्याने शरीराचं श्वसन तंत्र चांगलं राहतं. पण जर तुमच्या परिवारात कुणाला डायबिटीस असेल तर एक्सरसाइज करून याचा धोका कमी केला जाऊ शकतो. अशा लोकांमध्ये डायबिटीसची लक्षणे उशीरा दिसू लागतात, इतकंच नाही तर याने रूग्णांमध्ये शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळे सर्वांनी आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटे किंवा पाच दिवस एक्सरसाइज करावी.
मद्यसेवन आणि धुम्रपान
जास्त धुम्रपान आणि मद्यसेवनाचा थेट संबंध हृदयरोग, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीसशी आहे. धुम्रपानाने ब्लड वेसल्सवर प्रभाव पडतो आणि धमण्या आकुंचन पावतात. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका असतो. यामुळे डायबिटीसचा धोकाही वाढतो. जास्त मद्यसेवन केल्याने फॅटी लिव्हर ची समस्या सुरू होते, जी पुढे जाऊन डायबिटीसचं कारण ठरते.
पोषणाची कमतरता
आवश्यक मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएट्सच्या कमतरतेमुळे अनेक आजार होतात आणि याने पूर्ण आरोग्य बिघडतं. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, पालेभाज्या, वीगन आणि मेडीटेरियन डायट डायबिटीसचा धोका टाळू शकतात. सोबत बऱ्याच काळापासून व्हिटॅमिन डी ची कमतरता असले तर डायबिटीसचा धोका वाढतो. प्रोटीन, फायबर, आवश्यक फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स असलेला आहार घेतला तर शरीरात ब्लड शुगर लेव्हल आणि इन्सुलिनचं प्रमाण कंट्रोलमध्ये राहतं.
लठ्ठपणा
लिव्हर आणि शरीरात जमा होणाऱ्या फॅटला, विसरल फॅट म्हटलं जातं. ज्याचा इन्सुलिन रेजिस्टेंससोबत संबंध आढळून आला आहे. यामुळे व्यक्तीचं वजन वाढू लागतं. ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना डायबिटीस होऊ शकतो. तसेच लोअर बॉडी इंडेक्स असलेल्या लोकांनाही डायबिटीसचा धोका राहतो.
तणाव
तणाव शरीर आणि मेंदूच्या क्रियामध्ये गडबड करतो. ज्यामुळे लठ्ठपणा, इन्सुलिन रेजिस्टेंस आणि डायबिटीसचा धोका वाढतो. झोपेच्या कमतरतेमुळेही ही समस्या वाढू शकते. त्यामुळे एक्सरसाइज, मेडिटेशन आणि पौष्टिक आहार घेऊन तणाव दूर करावा.