शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर काढतील या सवयी, हृदयविकार, स्ट्रोक राहतील दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 03:41 PM2022-08-21T15:41:33+5:302022-08-21T15:44:04+5:30
उच्च एलडीएलमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या समस्या उद्भवू शकतात, परंतु जीवनशैलीत काही छोटे बदल करून तुम्ही या समस्या टाळू शकता. चला जाणून घेऊया.
बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की कोलेस्टेरॉलच्या जास्त सेवनाने आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि ते खूप हानिकारक आह. परंतु हे पूर्णपणे बरोबर नाही. कारण कोलेस्ट्रॉलचे अनेक फायदे देखील आहेत, जे शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.
शरीरातील हार्मोन्स वाढवण्यासोबतच लिव्हरमध्ये पित्त रस तयार करण्यासाठी आणि शरीरातील पेशी सुरक्षित ठेवण्यासाठी कोलेस्टेरॉल खूप फायदेशीर आहे. कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत, एलडीएल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल आणि एचडीएल म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल. उच्च एलडीएलमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या समस्या उद्भवू शकतात, परंतु जीवनशैलीत काही छोटे बदल करून तुम्ही या समस्या टाळू शकता. चला जाणून घेऊया.
तणाव घेणे टाळा
सेंट ल्यूक हेल्थ डॉट ओआरजीच्या मते, तणावामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते आणि त्याचा परिणाम हार्मोनल संतुलनावरही होतो. चिंता आणि तणावापासून दूर राहणे शरीरातील एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी वाढवून एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते.
धूम्रपान टाळा
तुम्ही कोणत्याही व्यसनापासून दूर राहा. ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात आणि कर्करोगासारख्या अनेक आजारांना जन्म देतात. ते फुफ्फुसांनादेखील खराब करतात आणि एलडीएल कोलेस्टेरॉलसाठी उपयुक्त ठरतात. धूम्रपान सोडल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यासोबतच इतर आजारांचा धोकाही कमी होऊन शरीर निरोगी बनते.
पौष्टिक आहार घ्या
बीन्स, नट, एवोकॅडो, फळे, भाज्या, ओट्स, मासे यासारखे निरोगी पदार्थ खा. जे एचडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवतात. तसेच कोलेस्ट्रॉलमुळे रक्ताभिसरणात होणाऱ्या समस्यादेखील प्रतिबंधित होतात. निरोगी खाण्यासोबतच तळलेले आणि जास्त चरबीयुक्त पदार्थांपासून दूर राहणे आवश्यक आहे.
नियमित व्यायाम करा
जॉगिंग, सायकलिंग, दोरीच्या उड्या मारणे यासारख्या व्यायामांचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समावेश करा. ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढते. नियमित व्यायामामुळे हृदयही निरोगी राहते.