मोहरीच्या तेलात लिंबाच रस मिक्स करून लावा, मग बघा केस कसे होतात मुलायम आणि मजबूत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 12:29 PM2022-09-10T12:29:47+5:302022-09-10T12:30:04+5:30
Mustard Oil And Lemon For Hair: जर तुम्ही या तेलात लिंबाचा रस मिक्स केला तर याने डॅन्ड्रफची समस्या कमी केली जाऊ शकते. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, केसांमध्ये मोहरीचं तेल आणि लिंबाचा रस लावण्याचे फायदे काय होतात?
Mustard Oil And Lemon For Hair: मोहरीच्या तेलाचा वापर प्रत्येक घरात केला जातो. बरेच लोक आपल्या केसांवर आणि त्वचेवर लावतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, मोहरीचं तेल केसांना फार मजबूत करतं आणि पांढरे केस काळे करण्यास मदत करतं. या तेलातील गुण केसांच्या मुळांना मजबूत करतं. तेच जर तुम्ही या तेलात लिंबाचा रस मिक्स केला तर याने डॅन्ड्रफची समस्या कमी केली जाऊ शकते. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, केसांमध्ये मोहरीचं तेल आणि लिंबाचा रस लावण्याचे फायदे काय होतात?
नैसर्गिक कंडीशनर
मोहरीच्या तेलामध्ये अल्फा फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतं. जे केसांना पोषण देतं. जर तुम्ही नियमितपणे केसांना मोहरीचं तेल लिंबाच्या रसासोबत मिक्स करून लावलं तर याने तुमचे केस फ्रेश आणि बाउंसी दिसतात. मोहरीच्या तेलामध्ये लिंबाला रस मिक्स करून लावला तर केस मुलायमही होतात. हे मिश्रित तेल तुम्हाला आठवड्यातून 2 वेळा लावावं लागेल.
केसांना पोषण मिळतं
अनेक लोकांना केसगळती आणि केस तुटण्याची समस्या असते. केसगळती आणि तुटणाऱ्या केसांचं कारण केसांना योग्य पोषण न मिळणं हे आहे. तुमचे केस हळूहळू डॅमेज होऊ लागतात. तेच जर तुम्ही रोज मोहरीचं तेल केसांना लावून मसाज करत असाल तर तुमचे केस आतून मजबूत होतील. त्यामुळे जर तुम्ही रोज केसांना तेल लावू शकत नाहीत तर आठवड्यातून 3 दिवस केसांना मोहरीचं तेल आणि लिंबाचा रस लावा.
डॅंड्रफ होतात कमी
मोहरीचं तेल आणि लिंबाच्या रसामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-बॅक्टेरिअल गुण भरपूर प्रमाणात असतात. जे डॅंड्रफसाठी फायदेशीर असतात. याने डॅंड्रफची समस्या लगेच दूर होते.