Hair Care Tips : केस धुण्यासाठी थंड किंवा गरम, कोणतं पाणी योग्य?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 11:31 AM2022-11-11T11:31:02+5:302022-11-11T11:32:55+5:30
Hair Care : केस धुतल्याने डोक्याच्या त्वचेवर आणि केसांना लागलेली धुळ, माती, तेल निधून जातं. पण केस धुताना अनेकांना हा प्रश्न पडतो की, केस थंड पाण्याने धुवायचे की गरम पाण्याने?
Hair Care : केस प्रत्येक व्यक्तीच्या पर्सनॅलिटीचा महत्त्वाचा भाग असतात, त्यामुळे चेहऱ्या इतकीच त्यांचीही काळजी घ्यावी लागते. केस निरोगी आणि चांगले ठेवण्यासाठी त्यांची वेळोवेळी स्वच्छता करणे गरजेचं असतं. केस धुतल्याने डोक्याच्या त्वचेवर आणि केसांना लागलेली धुळ, माती, तेल निधून जातं. पण केस धुताना अनेकांना हा प्रश्न पडतो की, केस थंड पाण्याने धुवायचे की गरम पाण्याने?
खरंतर या अजिबात दुमत नाहीये की, गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचा संपूर्ण थकवा निघून जातो आणि ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. पण काय केस गरम पाण्याने धुतले जाऊ शकतात? किंवा तसं करणं योग्य राहील का? तशी गरम पाण्याने केस धुतल्याने केस रखरखीत होतात, निर्जिव होतात आणि कमजोर होतात अशी धारणा आहे. मग काय अशावेळी केस थंड पाण्याने धुतले पाहिजे? असाही प्रश्न उभा राहतो.
एका प्रसिद्ध हेअर एक्सपर्टनुसार, केस हे नेहमी थंड पाण्यानेच धुवावे. याने शॅम्पू सहजपणे आणि चांगल्याप्रकारे निघून जातं. पण त्यांचं असंही म्हणणं आहे की, पाणी थंड असण्यासोबत पाण्याची क्वालिटी काय आहे याचीही काळजी घेतली पाहिजे. ज्या पाण्याने तुम्ही केस धुणार आहात ते सॉफ्ट वॉटर असायला हवं, हार्ड वॉटरने केस धुतल्याने शॅम्पूमध्ये चांगला फेस तयार होत नाही आणि केस रखरखीतही होतात. त्यामुळे केस धुण्यासाठी सॉफ्ट पाण्याचाच वापर करावा.
(Image Credit : www.stylishandtrendy.com)
गरम पाणी केसांचा शत्रू आहे. पण तरीही जर तुम्ही पूर्णपणे थंड पाण्याने केस धुवू शकत नसाल तर कोमट पाण्याचा वापर करु शकता. असंही करु नका की, शरीरासाठी गरम पाणी आणि केसांसाठी थंड पाणी. कारण दोन प्रकारच्या तापमानामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोमट पाणी वापरणे सर्वात चांगला पर्याय आहे.