कोरोनामुक्त रुग्णांमध्ये केस गळतीची समस्या गंभीर, लसीकरण झालेल्यांमध्ये लक्षणं कमी,तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 04:11 PM2021-10-17T16:11:10+5:302021-10-18T19:37:41+5:30

नवी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ने कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर अभ्यास केला आहे. ज्यामध्ये असे आढळून आले आहे की, कोरोनामधून बरे झाल्यानंतर २८ टक्के लोकांना केस गळण्याची समस्या आहे.

hair fall after post covid Delhi AIIMS doctor's research says | कोरोनामुक्त रुग्णांमध्ये केस गळतीची समस्या गंभीर, लसीकरण झालेल्यांमध्ये लक्षणं कमी,तज्ज्ञांचा दावा

कोरोनामुक्त रुग्णांमध्ये केस गळतीची समस्या गंभीर, लसीकरण झालेल्यांमध्ये लक्षणं कमी,तज्ज्ञांचा दावा

Next

कोरोनाव्हायरसमधून बरे झाल्यानंतरही लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नवी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ने कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर अभ्यास केला आहे. ज्यामध्ये असे आढळून आले आहे की, कोरोनामधून बरे झाल्यानंतर २८ टक्के लोकांना केस गळण्याची समस्या आहे. हा अभ्यास एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या टीमने केला आहे. ज्यात सुमारे १२ डॉक्टर सहभागी होते.

एम्सच्या डॉक्टरांनी कोरोनापासून बरे झालेल्या एकूण १८०१ लोकांचा अभ्यास केला आहे. अभ्यासानुसार, १३ टक्के लोकांना तीन महिन्यांनंतरही संसर्गाची वेगवेगळी लक्षणे आहेत. यापैकी २८ टक्के लोकांना केस गळण्याची समस्या आहे. या व्यतिरिक्त, कोरोनापासून बरे झालेल्या लोकांमध्ये इतर अनेक लक्षणे देखील आहेत. २५ टक्के लोकांना झोपेचा त्रास होत आहे. २७ टक्के लोक डोकेदुखीची तक्रार करत आहेत, १४ टक्के लोक स्मरणशक्ती कमी झाल्याची तक्रार करत आहेत.

त्वचा रोगाची समस्या
केस गळणे, श्वासोच्छवास आणि थकवा हेच केवळ कोरोनामधून बरे झालेल्या लोकांमध्ये आढळत नाहीत, तर त्वचेशी संबंधित समस्या देखील आढळत आहेत. त्वचेवर लाल रॅशेसची प्रकरणे सात टक्के लोकांमध्ये दिसून आली. बोट आणि अंगठ्याच्या त्वचेचा रंग बदलण्याची समस्या चार टक्के लोकांमध्ये दिसून आली आहे.

लसीचे डोस घेतलेल्या लोकांमध्ये लक्षणे कमी
अभ्यासात डॉक्टरांनी सांगितले आहे की, कोरोना लसीचा डोस घेतलेल्यांना ४५ टक्के ही लक्षणे हळूहळू कमी होत आहेत. कोरोनामधून बरे होण्याच्या पहिल्या महिन्यापर्यंत रुग्णांमध्ये लक्षणे खूप तीव्र होती, परंतु लस घेतल्यानंतर ही लक्षणे दोन ते तीन महिन्यांत कमी झाली आहेत.

ही लक्षणे देखील दिसू लागली
७९ टक्के लोकांमध्ये अशक्तपणा
२५ टक्के लोकांना श्वास घेण्यास त्रास
१८ टक्के लोकांचे वजन कमी होते
३.११ टक्के लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या

काळजी घेणे महत्वाचे
डॉक्टरांच्या मते, बाहेर जाताना डोके उन्हात झाकून ठेवा. हे आपल्या केसांना सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आणि प्रदूषणापासून वाचवेल. केसांना पुन्हा पुन्हा स्पर्श करणे टाळा. त्यांना तेल लावा आणि दररोज केस विंचरा.

Web Title: hair fall after post covid Delhi AIIMS doctor's research says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.