Hair Fall : एक्सपर्टनुसार हा एक पदार्थ केसगळतीचं आहे मुख्य कारण, खाता-पिताना घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 01:13 PM2022-02-28T13:13:15+5:302022-02-28T13:14:37+5:30

Hair Fall : एक्सपर्ट सांगतात की, यामागे केवळ वयाची भूमिका नाही तर खाण्यातील एक पदार्थही केसांवर प्रभाव टाकतो. या पदार्थामुळे केस पातळ होता. यामुळे तरूणांमध्ये केसगळती होत आहे. 

Hair Fall : Common type androgenetic alopecia causes treatment sodium | Hair Fall : एक्सपर्टनुसार हा एक पदार्थ केसगळतीचं आहे मुख्य कारण, खाता-पिताना घ्या काळजी!

Hair Fall : एक्सपर्टनुसार हा एक पदार्थ केसगळतीचं आहे मुख्य कारण, खाता-पिताना घ्या काळजी!

googlenewsNext

केसगळती (Hair Fall) ही एक सामान्य समस्या झाली आहे. ज्यामुळे लोक अलिकडे खूप जास्त वैतागले आहेत. महिला आणि पुरूष दोघांमध्येही केसगळतीची समस्या वेगवेगळ्या प्रकारे बघायला मिळते. केसगळतीचं सर्वात कॉमन कारण एंड्रोजेनेटिक एलोपेसिया असतं ज्यात महिला आणि पुरूषांचे केस एका पॅटर्नमध्ये गळतात. सामान्यपणे ५० पेक्षा जास्त वयाचे पुरूष आणि ६५ पेक्षा जास्त महिलांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते. पण एक्सपर्ट सांगतात की, यामागे केवळ वयाची भूमिका नाही तर खाण्यातील एक पदार्थही केसांवर प्रभाव टाकतो. या पदार्थामुळे केस पातळ होता. यामुळे तरूणांमध्ये केसगळती होत आहे. 

काय सांगतात एक्सपर्ट?

UK तील प्रसिद्ध ट्रायकोलॉजिस्ट केविन मूर म्हणाले की, आहारातून जास्त प्रमाणात मिठाचं सेवन केल्याने निश्चितपणे केसांच्या आरोग्याला नुकसान पोहोचतं आणि यामुळेच केस गळतात. British GQ ला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले की, 'खूप जास्त मीठ खाल्ल्याने सोडिअम तयार होतं जे केसांच्या रोमच्या म्हणजे मुळात जमा होऊ लागतं. ज्याने हेअर फॉलिकलच्या ब्लड सर्कुलेशनवर प्रभाव पडतो. यामुळे आवश्यक पोषक तत्व केसांच्या रोमपर्यंत पोहचू शकत नाही.

मूर म्हणाले की, 'सोडिअमच्या जास्त प्रमाणामुळे केस निर्जीव आणि कमजोर होतात आणि हेच केसगळतीचं कारण ठरतं. फार कमी सोडिअममुळेही केसांच्या विकासात समस्या येते. कमी मीठ खाल्ल्याने शरीरात आयोडिनची कमतरता होते.  जे गुड थायरॉइड फंक्शनसाठी गरजेचं आहे. ते म्हणाले की, जर थायरॉइड असंतुलित आहे, तर तुमचे केस प्रभावित होतील. याने केस निर्जीव आणि पातळ होतील.

कसे मजबूत होतात केस - एक्सपर्टनुसार, केस मजबूत असणं तुमच्या डाएटमध्ये सामिल व्हिटॅमिन आणि मिनरल्सवर अवलंबून आहे. आयर्न आणि व्हिटॅमिन B5 मुळे केस पातळ होण्यापासून वाचतात आणि डोक्याची त्वचा चांगली राहते. तर केसांच्या मजबूतीसाठी आणि चमकदार होण्यासाठी प्रोटीनची गरज असते. त्यासोबतच वातावरणामुळेही केसांची क्वालिटी खराब होते. जे सामान्य बाब आहे. काही लोकांमध्ये ही आनुवांशिकही असतं.

जास्त मीठ धोकादायक - तंत्रिका आणि मांसपेशींचं काम योग्यप्रकारे होण्यासाठी शरीर मिठावर निर्भर असतं. पण मिठाचं प्रमाण जास्त झालं तर याने ब्लड प्रेशर वाढतं. याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. NHS नुसार, वयस्कांनी एका दिवसात ६ ग्रॅमपेक्षा जास्त मिठ खाऊ नये. हे जवळपास एका चमचा इतकं असतं ज्यात २.४ ग्रॅम सोडिअम असतं. जेवण बनवताना किंवा खाताना लक्ष ठेवून तुम्ही तुमच्या मिठाचं प्रमाण ट्रॅक करू शकता.

कशात असतं जास्त मिठ - काही फूड आयटम्समध्ये आधीच मिठाचं प्रमाण जास्त असतं ज्यात टोमॅटो सॉस, पॅक्ड फूड्स, ब्रेड्स, रेडी टू इट फूड्स, सॅंडविच आणि सूप यांचा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही काय खरेदी करता यावर लक्ष देण्याची गरज असते. खरेदी करताना पॅकेटवरील माहिती तपासा.
 

Web Title: Hair Fall : Common type androgenetic alopecia causes treatment sodium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.