केस गळणं असू शकतं 'या' गंभीर आजारांचं लक्षणं, वेळीच सावध व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 04:42 PM2022-08-16T16:42:37+5:302022-08-16T16:44:53+5:30

ज्याप्रमाणे सर्दी आणि खोकला हे फ्लूचं (Flu) लक्षण समजलं जातं, त्याचप्रमाणे केस पातळ होणं, गळू लागणं हेदेखील आरोग्यविषयक समस्येचं लक्षण असतं. केसांमध्ये बदल होण्याची नेमकी काय कारणं आहेत, त्याविषयी जाणून घेऊ या...

hair fall or loss can be symptoms of anemia, thyroid or hypertension | केस गळणं असू शकतं 'या' गंभीर आजारांचं लक्षणं, वेळीच सावध व्हा!

केस गळणं असू शकतं 'या' गंभीर आजारांचं लक्षणं, वेळीच सावध व्हा!

Next

केसांचं (Hair care tips) आरोग्य आणि सौंदर्य कायम राहावं, यासाठी आपण सर्वतोपरी काळजी घेत असतो; पण एकंदर आरोग्याकडे दुर्लक्ष करून केवळ केसांची काळजी घेत असाल, तर तुमचे केस जास्त काळ सुंदर आणि निरोगी राहणार नाहीत. `एव्हरी डे हेल्थ`ने दिलेल्या माहितीनुसार, केसांचं टेक्श्चर, लांबी, लूक, दाटपणा यात दिसणारा बदल हा तुमच्या एकूण शारीरिक आरोग्यात काही तरी बदल झाल्याचं सूचक असतो, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

ज्याप्रमाणे सर्दी आणि खोकला हे फ्लूचं (Flu) लक्षण समजलं जातं, त्याचप्रमाणे केस पातळ होणं, गळू लागणं हेदेखील आरोग्यविषयक समस्येचं लक्षण असतं. केसांमध्ये बदल होण्याची नेमकी काय कारणं आहेत, त्याविषयी जाणून घेऊ या...

तणावामुळे होतात केस पांढरे
जी व्यक्ती दीर्घ काळ तणावात (Stress) असते, त्या व्यक्तीच्या `डीएनए`वर परिणाम होऊन केस पांढरे होऊ लागतात, असं एका संशोधनातून दिसून आलं आहे. पिग्मेंटेशन प्रॉडक्शन सेल्स वाढीसाठी कारणीभूत असणाऱ्या ऑक्सिडेटिव्हचं कार्य तणावामुळे विस्कळीत होतं आणि त्यामुळे केस कमजोर होऊ लागतात.

थायरॉइडच्या (Thyroid) समस्येमुळे केस होतात पातळ
तुम्हाला हायपोथायरॉयडिझमची समस्या असेल तर शरीरातल्या थायरॉइड ग्रंथी पुरेशा प्रमाणात थायरॉइड हॉर्मोनचं उत्पादन करू शकत नाहीत. त्यामुळे केस पातळ होऊन गळू लागतात.

अ‍ॅनिमिया (Anemia) असल्यास केस गळू लागतात
शरीरात लोहाची कमतरता असेल किंवा हिमोग्लोबीन कमी झालं असेल तर त्याचा थेट परिणाम केसांवर होतो. जेव्हा एखादी व्यक्ती अ‍ॅनिमियाग्रस्त होते, तेव्हा त्या व्यक्तीचे केस गळू (Hair Fall) लागतात.

 एस्ट्रोजेनच्या पातळीत एकदम बदल झाला तरीदेखील केस गळू शकतात; मात्र सर्वसामान्यपणे ही समस्या मासिक पाळीदरम्यान अधिक रक्तस्राव झाल्याने किंवा गर्भधारणेनंतर दिसू लागते.
प्रोटीनच्या (Protein) कमतरतेमुळे केस गळतात

केसांच्या आरोग्यासाठी प्रोटीन अर्थात प्रथिनं आवश्यक असतात.
केसांच्या वाढीसाठीही प्रोटीन्स गरजेची असतात. जेव्हा शरीरातली प्रोटीन्स कमी होऊ लागतात तेव्हा केस गळण्याची समस्या सुरू होते. अशा वेळी आहारात नॉनफॅट ग्रीक योगर्ट, छोले, डाळ आणि चिकन ब्रेस्ट यांचा समावेश करावा.

पोषक घटकांअभावी (Nutrition) केस होतात कोरडे आणि खराब
शरीरात पोषक घटकांची कमतरता असेल, तर तुमचे केस कोरडे आणि निर्जीव होऊ लागतात. ही समस्या पॉलीसिस्टीक ओव्हेरियन सिंड्रोममुळेदेखील उद्भवू शकते. अशा स्थितीत तुम्ही दैनंदिन आहारात सर्व प्रकारची जीवनसत्त्वं, खनिजं, क्षारयुक्त पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे.

Web Title: hair fall or loss can be symptoms of anemia, thyroid or hypertension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.