खरंच जास्त एक्सरसाइज केल्यानेही केसगळीतीची समस्या होते का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 05:07 PM2023-11-30T17:07:19+5:302023-11-30T17:08:25+5:30
Hair fall Reason : अनेकांना असाही प्रश्न पडतोय की, जास्त एक्सरसाइज केल्यानेही केसगळती होते का? चला जाणून घेऊ याचं उत्तर...
Hairfall Reason : अलिकडे कमी वयातच अनेकांना केसगळती किंवा टक्कल पडण्याची समस्या होते. याची कारणेही वेगवेगळी असतात. जी व्यक्तीनुसार आणि त्यांच्या लाइफस्टाईलनुसार बदलतात. त्यामुळे लोक वेगवेगळे उपाय करत राहतात. पण काहींना याचा फायदा होतो तर काहींना होत नाही. अनेकांना असाही प्रश्न पडतोय की, जास्त एक्सरसाइज केल्यानेही केसगळती होते का? चला जाणून घेऊ याचं उत्तर...
३.५ कोटी पुरूषांना ही समस्या
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात जवळपास ३.५ कोटींपेक्षा जास्त पुरूषांना केसगळतीची समस्या आहे. फिटनेस इंडस्ट्रीमध्येही अनेकांना डोक्यावर केस कमी आहेत किंवा टक्कल आहेत. त्यामुळे आज आपण जाणून घेऊया की, एक्सरसाइज केल्यानेही केसगळतीची समस्या होते का?
काय आहे सत्य?
एका वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, एक्सरसाइज करताना केसगळतीची समस्या होणे सामान्य बाब आहे. मुळात केसगळतीचं किंवा टक्कल पडण्याचं मुख्य कारण डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनचं असंतुलित झालेलं प्रमाण आहे. याचं प्रमाण टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण जास्त झल्यावर वाढतं. दुसरीकडे हेही खरं आहे की, बॉडी बिल्डर किंवा एथलिट टेस्टोस्टेरॉन बूस्टर किंवा सप्लिमेंट्सचा वापर करून टेस्टोस्टेरॉन हाय करण्याचा प्रयत्न करतात. टेस्टोस्टेरॉन वाढलं तर डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढतं आणि केसगळती होऊ लागते.
मुख्य कारणांपैकी एक
रिसर्चनुसार, केसगळतीला लो कार्ब डाएट घेणंही कारणीभूत असतं. वजन कमी करण्यासाठी लोक कार्बोहायड्रेट आहारातून कमी घेतात. एका रिसर्चमध्ये ४५ लोकांना लो-कार्ब डाएट देण्यात आली. यातील २ लोकांमध्ये केस पातळ होणे आणि केसगळतीची समस्या बघण्यात आली.
उपाय
जर एखाद्या व्यक्तीचे केस बूस्टर किंवा स्टेरॉइड घेतल्याने पातळ होतात किंवा गळत असतील तर त्यांनी याचं सेवन बंद केलं पाहिजे. तसेच वेळीच एक्सपर्टचा सल्ला घ्यावा. तसेच आहार आणि लाइफस्टाईलमध्ये बदल करूनही तुम्ही केसगळतीची समस्या दूर करू शकता.