पांढऱ्या केसांवर करा 'हा' नैसर्गिक उपाय, काही दिवसात दिसेल परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 11:40 AM2022-11-09T11:40:04+5:302022-11-09T11:40:42+5:30
आजकाल तरुणही पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहेत. वय वाढले की केस पांढरे होणारच ते स्वाभाविक आहे. मात्र सध्या केसांवर केले जाणारे प्रयोग सुद्धा केसांना डॅमेज करत आहेत.
केस पांढरे होत आहेत ही समस्या आता फक्त प्रौढांपरती मर्यादित राहिलेली नाही. आजकाल तरुणही पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहेत. वय वाढले की केस पांढरे होणारच ते स्वाभाविक आहे. मात्र सध्या केसांवर केले जाणारे प्रयोग सुद्धा केसांना डॅमेज करत आहेत. सलून किंवा पार्लरमध्ये जाऊन आपण केसांवर जे ट्रिटमेंट करतो त्यात केमिकल असते. या केमिकल चा परिणाम दीर्घ काळाने दिसू शकतो.
केस पांढरे होण्यावर उपाय काय ?
पांढरे केस काळे करायचे असतील तर उपाय एकच आहे जो सर्वांनीच घरी आज्जीकडून ऐकला असेल. ते म्हणजे शिकेकाईचा वापर. शिकेकाई हे कृत्रिम नाही तर नैसर्गिक प्रोडक्ट आहे. त्यामुळे शिकेकाईपासून काहीच धोका नाही.
शिकेकाईचे फायदे नेमके काय ?
केस मुलायम होतात
धुळीमुळे, प्रदुषणामुळे केस खराब होतात, गळू लागतात. बाहेर फिरताना केस मोकळे असतील तर गुंता होऊन केस गळतातच. अशावेळी शिकेकाईमुळे खूपच राठ झालेले केस मुलायम होण्यास मदत मुळते. केमिकल प्रोडक्टमुळे जर केसांची चमक गेली असेल तर शिकेकाई खूपच फायदेशीर आहे. यामुळे केस चमकदारही होतील.
केसांने फुटलेले फाटे कमी होतात
केसांना फाटे फुटण्याची समस्या ही मुलींमध्ये सहसा प्रचंड दिसून येते. शिकेकाई मुळे केसांनाही एकप्रकारची शिस्त लागते. केसांवर खालच्या बाजुला फाटे फुटतात. ते शिकेकाईमुळे नाहीसे होतील.
कोंडा कमी होईल
केस काळे करण्याशिवाय शिकेकाईमुळे कोंडा देखील कमी होतो. शिकेकाईमध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म केसांना मिळतात आणि केस निरोगी राहतात. अर्थात काही जणांना याचा फायदा होईल काहींना कोंड्याच्या समस्येसाठी इतर उपाय करावे लागतील.
कशी वापरावी शिकेकाई पावडर ?
केस काळे करण्यासाठी शिकेकाई योग्य पद्धतीने लावणे गरजेचे आहे. एका भांड्यात आपल्या केसांच्या लांबीनुसार शिकेकाई घ्यावी. त्यात दही घालून मिश्रण करावे. हे मिश्रण फार दाट किंवा पातळ नसावे. केसांना मध्यभगी भांग पाडून वरपासून खालपर्यंत पेस्ट लावावी. किमान ४५ मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर शॅंपूने केस स्वच्छ धुवावे. आठवड्यातुन दोनदा ही प्रक्रिया करा, केस काळे होण्यास सुरुवात होईल.