सतत भूक कमी लागते का? या भाजीचं नियमित करा सेवन दूर होईल समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 11:49 AM2022-08-20T11:49:34+5:302022-08-20T11:49:42+5:30

Shepus Vegetable : तुमच्या पोटातील तापमानात गडबड झाली आहे. यासाठी गरजेचं आहे की, तुम्ही असा आहार घ्या ज्यात नैसर्गिक तेल आणि पाणी असावे. यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे शेपूची भाजी.

Halth Tips : Benefits of shepus vegetable consumption you should know this | सतत भूक कमी लागते का? या भाजीचं नियमित करा सेवन दूर होईल समस्या!

सतत भूक कमी लागते का? या भाजीचं नियमित करा सेवन दूर होईल समस्या!

googlenewsNext

Shepus Vegetable : हिवाळ्यात वेगवेगळे पदार्थ खाण्याची वेगळीच मजा असते. पण कधी कधी जास्त मसालेदार किंवा वेगवेगळे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पोटात जळजळ, पोट फुगणे किंवा गॅसची समस्या होऊ लागते. असं होत असेल तर समजा की, तुमच्या पोटातील तापमानात गडबड झाली आहे. यासाठी गरजेचं आहे की, तुम्ही असा आहार घ्या ज्यात नैसर्गिक तेल आणि पाणी असावे. यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे शेपूची भाजी.

शेपूच्या भाजीचा वापर पूर्वीपासून औषध म्हणून केला जातो. भारतीय घरांमध्ये शेपूचा वापर भाजीसाठीही केला जातो. आवडीने ही भाजी खाल्ली जाते. हिवाळ्यात शेपूची भाजी फारच फायदेशीर मानली जाते. कारण या भाजीमुळे वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत होते. अनेकांना शेपूची भाजी आवडते तर काहींना आवडत नाही. पण हे फायदे वाचल्यावर शेपूची भाजी खाणे नक्कीच सुरु करतील.

पचनक्रिया होते चांगली

शेपूचा वापर पचनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी केला जातो. ज्यात भूक कमी लागणे, पोट फुगणे, यकृताची समस्या आणि पित्ताशयाची समस्या यांचा समावेश आहे. तसेच याने मूत्राशयाशी संबंधी समस्या, मुतखड्याची समस्या दूर केल्या जातात. त्यासोबतच सर्दी-खोकला, ताप, संक्रमण, वेदना, अल्सर, मासिक पाळीतील समस्या, झोप कमी लागणे याही समस्या दूर करण्यास मदत मिळते. 

शेपूची भाजी खाण्याचे फायदे

शेपूच्या भाजीमध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असल्याने कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी राहतं. तसेच यात अनेकप्रकारचे अॅंटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन, जसे की, पिरिडॉक्सिन आणि नियासीन, त्यासोबतच फायबरही असतात. याने रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवला जातो. 
शेपूच्या भाजीच्या पानांमध्ये आणि बियांमध्ये लायमोनीन व युजीनॉलसारखं आवश्यक तेल आढळतं. या तेलामुळे शुगरचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. ही भाजी डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानली जाते. 

या भाजीपासून तयार तेलामुळे वात, पचन आणि कीटाणूनाशक गुण असतात. त्यासोबतच शेपूमध्ये रायबोफ्लेविन, फोलिक अॅसिड, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, नियासीन आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतात. ही सगळीच तत्व शरीराच्या मेटाबॉलिज्मसाठी आवश्यक असतात. 

शेपूच्या भाजीचा कॅल्शिअमचं प्रमाण वाढवून हाडं मजबूत करणे आणि हाडांचं होणारं नुकसान रोखणे यासाठीही होतो. ऑस्टियोपोसोसिसची समस्या कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होते. त्यामुळे शेपूच्या भाजीचं नियमीत सेवन केल्यास ऑस्टियोपोरोसिस आजार रोखला जाऊ शकतो. तसेच यातील अॅंटी-बॅक्टेरिअल तत्वामुळे संक्रमणासोबत लढण्याची ताकदही वाढते. 

तसेच, शेपूच्या भाजीमध्ये असलेल्या गुणांमुळे पचनक्रियेतही सुधारणा होते. याने तोडांची येणारी दुर्गंधीही कमी केली जाऊ शकते. पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्याही याने दूर होण्यास मदत मिळते. डायरियापासून बचाव, पोट दुखणे आणि आतड्यांमधील गॅस कमी करणे हे फायदे होतात.

Web Title: Halth Tips : Benefits of shepus vegetable consumption you should know this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.