जास्त आनंदी राहणाऱ्या वयोवृद्धांचं आयुष्य वाढतं - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 12:23 PM2018-08-30T12:23:08+5:302018-08-30T12:26:03+5:30
नेहमी आनंदी आणि प्रसन्न राहणाऱ्या वयोवृद्ध माणसांचं आयुष्य वाढतं. ऐकून विचारात पडलात ना? एका रिसर्चमधून असं सिद्ध झालं आहे.
नेहमी आनंदी आणि प्रसन्न राहणाऱ्या वयोवृद्ध माणसांचं आयुष्य वाढतं. ऐकून विचारात पडलात ना? एका रिसर्चमधून असं सिद्ध झालं आहे. संशोधकांच्या या रिसर्च टिममध्ये एका भारतीय वंशाच्या व्यक्तीचाही समावेश आहे.
एज अॅन्ड एजिंग नावाच्या पत्रिकेतून प्रकाशित झालेल्या रिसर्चमध्ये 4,478 लोकांचा समावेश करण्यात आला होता. 2009मध्ये सुरू केलेलं हे संशोधन 31 डिसेंबर 2015 पर्यंत सुरू राहिलं. यामध्ये सुरुवातीला आनंद आणि त्यानंतर कोणत्याही कारणाने मृत्यू होण्याच्या सर्व शक्यतांचा अभ्यास करण्यात आला.
सिंगापूरमधील ड्यूकृ-एनयूएस मेडिकल स्कूलचे सहाय्यक प्रोफेसर राहुल मल्होत्रा यांनी सांगितले की, संशोधनातून समोर आलेल्या तथ्यांमधून असे सिद्ध झाले आहे की, प्रसन्न राहण्यासाठी करण्यात आलेले थोडेसे प्रयत्नही वयोवृद्ध व्यक्तिंना दिर्घायुष्य लाभण्यासाठी फायदेशीर ठरतात.
मल्होत्रा यांनी सांगितले की, आनंदी राहणं किंवा मन तंदुरूस्त ठेवण्याचे प्रयत्न केल्यासही वयोवृद्ध लोकांना दिर्घायुष्य लाभण्यास मदत होईल.
या सर्वेक्षणात सिंगापूरमध्ये राहणाऱ्या 60 वर्षांच्या आणि त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांना केंद्रित करण्यात आले होते.