आनंदाचं झाड आपल्याच दारात तर आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 02:41 PM2017-10-02T14:41:17+5:302017-10-02T14:42:12+5:30

तेच आपल्याला शिकवेल प्रसन्न कसं राहायचं ते..

Happiness tree is at your doorstep! | आनंदाचं झाड आपल्याच दारात तर आहे!

आनंदाचं झाड आपल्याच दारात तर आहे!

ठळक मुद्देआपल्या सभोवती कायम पॉझिटिव्ह एनर्जी राहील यासाठी प्रयत्न करायला हवा.‘ठंडा करके खाओ..’ कोणत्याही गोष्टीवर ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका.आपल्या गरजांवर आपलाच कंट्रोल ठेवा.

- मयूर पठाडे

अनेक गोष्टींनी आपण किरकिर करतो, चिडचिड करतो, जगावर उखडतो आणि स्वत:लाच वैताग करून घेतो.. पण खरंतर प्रसन्न आणि उत्साही जगण्याचे सारे उपाय आणि युक्त्या आपल्याच हाती असतात. आपल्याला कसं जगायचंय ते आपल्याच हातात असतं. त्याची योग्य ती कृती तेवढी आपल्याला करायला हवी.
काहीच अवघड नाही त्यात.. तुम्ही एकदा तशी लाईफस्टाईल जगायला सुरुवात केली की, बघा, पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यात कशी भरभरुन वाहायला लागेल. ती केवळ तुम्हालाच प्रसन्न करणार नाही, तर तुमच्या आजूबाजेचे लोक, वातावरणही प्रसन्न करून जाईल.
काय कराल त्यासाठी?
कायम आपल्या सभोवती पॉझिटिव्ह एनर्जी राहील यासाठी प्रयत्न करायला हवा. म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं, तर ‘ठंडा करके खाओ..’ कोणत्याही गोष्टीवर ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका. कितीही राग आलेला असेल, तरी त्यावर ताबडतोब रिअ‍ॅक्ट व्हायचं नाही. प्रत्येक घटनेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघा. एक लक्षात ठेवायला हवं, आपण चुकांमधूनच जास्त शिकतो. त्यामुळे ती चूक आपली असो, किंवा इतरांची, ती आपल्याच विकासासाठी उपयोगी आहे, हे लक्षात आलं की आपोआपच त्या प्रसंगाकडे बघण्याची आपली दृष्टी बदलेल.
आपल्याला आपल्या आयुष्यात काय हवं आहे, आपल्याकडे लोकांनी कोणत्या नजरेनं बघावं असं आपल्याला वाटतं, तीच ट्रिटमेंंट आपण इतरांनाही द्यायला हवी. लोकांना तुम्ही आदरानं वागवलं, तर तुम्हालाही तशाच प्रकारची वागणूक मिळेल, हे यातलं आणखी एक सत्य.
आपल्या गरजा कमी करा. गरजा कमी करा म्हणजे त्याविषयीचा हव्यास थोडा बाजूला ठेवायला हवा. त्या गरजांना आपल्यावर हावी होऊ देण्यापेक्षा सगळा कंट्रोल आपल्या हाती ठेवा.. एकदा का हा कंट्रोल आपल्या हाती आला, की काय बिशाद आहे कोणाची, आपल्याला दु:खी करण्याची?..
आनंदाचं, प्रसन्नतेचं झाड चालत आपल्या दाराशी येईल..

Web Title: Happiness tree is at your doorstep!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.