कानातून मळ काढण्यासाठी इअरबर्ड्स वापरताय का? या चूका केल्यास व्हाल कायमचे बहिरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 01:55 PM2021-09-30T13:55:39+5:302021-09-30T18:31:07+5:30
जाणून घ्या की, इअर बर्ड्स तुमच्या कानासाठी किती हानिकारक आहेत. जर तुम्ही देखील त्यांचा वापर करत असाल तर तुम्हाला त्यांचा काळजीपूर्वक वापर करणे आवश्यक आहे.
आपण बऱ्याचदा आपले कान साफ करण्यासाठी माचिसच्या काडीचा वापर करतो किंवा एखादं पिन वैगरे कानात घालतो. परंतु ही कान साफ करण्याची चूकीची तसेच खूप धोकादायक पद्धत आहे. लोकांना आता या गोष्टीची माहिती झाली आहे, ज्यामुळे काही लोक आता कान साफ करण्यासाठी इअर बर्डचा वापर करतात. हे इअर बर्ड हे प्लॅस्टीक किंवा लाकडाचे असते, ज्यावर कापुस गुंडाळलेला असतो.
यावर कापुस गुंडाळला असल्याने आपल्याला कानात काही इजा होणार नाही किंवा याचा त्रास होणार नाही असे आपल्याला वाटत जरी असले, तरी असे करणे देखील धोक्याचे ठरु शकते. हे इअर बर्ड्स तुमच्या कानात मॅचस्टिकसारखेच काम करतात. यामुळे तुमच्या कानालाही इजा होऊ शकते.
त्यामुळे अशा स्थितीत जाणून घ्या की, इअर बर्ड्स तुमच्या कानासाठी किती हानिकारक आहेत. जर तुम्ही देखील त्यांचा वापर करत असाल तर तुम्हाला त्यांचा काळजीपूर्वक वापर करणे आवश्यक आहे.
लोकं काय करतात?
खरं तर, लोक त्यांच्या कानातून घाण बाहेर काढण्यासाठी इअर बर्ड्स वापरतात. यासाठी ते सतत कानात बर्ड्स घालतात आणि शक्य तितक्या आत त्यांना घालताता. लोकांना असे वाटते की, असे केल्याने त्यांचे कान पूर्णपणे साफ होईल पण, असे करणे तुम्हाला खूप महागात पडू शकते. असे केल्याने तुमच्या कानातील वॅक्स बाहेर तर येत नाही आणि उलट तुम्हाला यामुळे अधिक समस्या येऊ शकतात.
इअर बर्ड्स धोकादायक का आहेत?
अनेक अहवालांमध्ये हे उघड झाले आहे की, कापसाचे बर्ड वापरल्याने तुम्हाला थोडा आराम मिळू शकतो, पण त्यामुळे कानाचा वॅक्स निघत नाही. हे इअर बर्ड्स ते वॅक्स काढून टाकण्याऐवजी, त्याला आणि घाणीला पुन्हा आत ढकलते. यामुळे हे मेण कानाच्या ड्रम किंवा कर्णमालाच्या जवळ जाते आणि त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.
अभ्यासात असे म्हटले गेले आहे की, जेव्हा तुमच्या कानात वॅक्स जास्त असते तेव्हा ते तुमचे कान स्वतःच स्वच्छ ठेवते. त्यामुळे यासाठी तुम्हाल इअर बर्ड्स वापरण्याची गरज नाही.
मग काय केलं पाहिजे?
अशा परिस्थितीत जर तुम्ही आंघोळ करताना तुमचे कान स्वच्छ केलेत तर ते जास्त चांगले ठरेल. कानातील वॅक्स देखील आपल्या कानासाठी खूप फायदेशीर आहे, जे इतर संसर्गांना प्रतिबंधित करते. तसेच, हे कानासाठी एक प्रकारचे जाळे म्हणून काम करते, म्हणून त्याची उपस्थिती आपल्या कानासाठी देखील आवश्यक आहे.
जर तुम्हाला यासंबाधीत काही समस्या येत असतील, तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा.