केवळ दारूच नाही तर या पदार्थांच्या सेवनामुळेही खराब होते किडनी, आजच खाणं करा कमी...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 04:23 PM2022-07-02T16:23:45+5:302022-07-02T16:24:12+5:30
Foods that can damage your Kidneys: आयुर्वेदिक डॉक्टर अबरार मुल्तानी यांनी सांगितलं की, काही असे पदार्थ असतात जे किडनीचं नुकसान करू शकतात. चुकीचं खाणं-पिणं आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे किडन्यांना अनेक प्रकारच्या समस्या होतात.
Foods that can damage your Kidneys: किडनी शरीरातील छोटा पण फार महत्वाच अवयव आहे. त्यामुळेच किडनीचं आरोग्य चांगलं राहणं गरजेचं आहे. किडनीचं काम शरीरातून टॉक्सिन पदार्थ म्हणजे विषारी पदार्थ बाहेर काढणं हेच आहे. याने यूरिनचं निर्माण होण्यासोबतच ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यासाठी खास हार्मोन्सही तयार होतात. आयुर्वेदिक डॉक्टर अबरार मुल्तानी यांनी सांगितलं की, काही असे पदार्थ असतात जे किडनीचं नुकसान करू शकतात. चुकीचं खाणं-पिणं आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे किडन्यांना अनेक प्रकारच्या समस्या होतात.
किडनी शरीरातून यूरिनच्या माध्यमातून विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं काम करतात. ज्यांच्या किडनीमध्ये समस्या असेल त्यांना त्यांच्या लाइफस्टाईल आणि आहारात बदल करावा लागतो. पण काही लोकांना किडनीत समस्या असल्याचं उशीरा समजतं ज्यामुळे त्यांना डायलिसिस करावं लागतं.
किडनी खराब झाल्याची सुरूवातीची लक्षणं
- भूक कमी लागणे
- शरीरावर सूज
- जास्त थंडी वाजणे
- त्वचेवर रॅशेज
- लघवी करताना त्रास
- चिडचिडपणा
किडनीचं नुकसान करणाऱ्या 5 गोष्टी
1. दारू
जास्त मद्यसेवन केलं तर किडनी खराब होतात. जास्त मद्यसेवन केल्याने किडनींची क्रिया योग्यपणे होण्यास समस्या होते. याचा प्रभाव तुमच्या मेंदूवर पडतो. मद्यसेवनाने केवळ किडनीचंच नाही तर शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचं देखील नुकसान होतं.
2. मीठ
मिठात सोडिअम असतं, हे पोटॅशिअमसोबत मिळून शरीरात फ्लूडचं प्रमाण योग्य ठेवतं. पण आहारातून जर जास्त मीठ खाल्लं गेलं तर फ्लूडचं प्रमाण वाढतं. ज्याने किडनीवर जास्त दबाव पडतो आणि नुकसान होतं.
3. डेअरी प्रॉडक्ट्स
दूध, चीज, पनीर, बटरसारखे डेअरी प्रॉडक्ट्सचं जास्त सेवन करणं किडनीसाठी चांगलं नाही. डेअरी प्रॉडक्ट्समध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. ज्याने किडनीला नुकसान पोहोचतं. डेअरी प्रॉडक्ट्समध्ये कॅल्शिअमही जास्त प्रमाणात असतं. ज्याने किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. त्यामुळे यांचं जास्त सेवन करू नका.
4. रेड मीट
रेड मीटरमध्ये प्रोटीन फार जास्त असतं. प्रोटीन आपल्या शरीरासाठी गरजेचंही असतं. पण अशाप्रकारचं मांस पचवणं आपल्या शरीरासाठी अवघड असतं. ज्याचा प्रभाव किडनीवर पडतो.
5. आर्टिफिशियल स्वीटनर
बाजारात मिळणाऱ्या मिठाई, कुकीज आणि ड्रिंक्समध्ये आर्टिफिशिअल स्वीटनर जास्त प्रमाणात असतं. जे किडनीच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. जे लोक डायबिटीसचे रूग्ण आहेत, त्यांना किडनीसंबंधी आजार होण्याचा धोका जास्त राहतो. अशा लोकांनी याचं सेवन करू नये.