Cholesterol causing foods: रक्तात वेगाने कोलेस्ट्रॉल वाढवतात या ४ गोष्टी, हार्ट अटॅक टाळायचा असेल तर आजच सोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 06:32 PM2022-03-17T18:32:32+5:302022-03-17T18:34:39+5:30
Cause of high Cholesterol : टेस्टच्या नादात असं काही खाऊ लागले आहेत की, हळूहळू त्यांचं आरोग्यही बिघडत आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे निर्माण होणारी गंभीर आणि जीवघेणी समस्या म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढणं.
Cause of high Cholesterol : निरोगी आणि चांगल्या आरोग्यासाठी चांगला आहार महत्वाचा ठरतो. असं मानलं जातं की, जर आहार चांगला असला तर अर्ध्यापेक्षा जास्त आजार असेच दूर होतात. आजकाल लोक पौष्टिक खाण्याऐवजी स्वादिष्ट खाण्याचे प्रेमी आहेत. टेस्टच्या नादात असं काही खाऊ लागले आहेत की, हळूहळू त्यांचं आरोग्यही बिघडत आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे निर्माण होणारी गंभीर आणि जीवघेणी समस्या म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढणं.
कोलेस्ट्रॉल वाढण्याच्या नुकसानाबाबत सांगायचं तर हे वाढल्याने हार्ट डिजीज आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, जगभरात इस्केमिक हार्ट डिजीज आणि स्ट्रोकचं एक मोठं कारण कोलेस्ट्रॉल वाढणं आहे.
हार्वर्ड मेडिकल स्कूलनुसार, जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलमुळे हृदयासंबंधी रोगांचा धोका कमी करायचा असेल तर तुम्ही रेड मीट, तळलेले पदार्थ, प्रोसेस्ड मीट आणि बेक्ड पदार्थांचं सेवन कमी करावं लागेल. आश्चर्याची बाब म्हणजे लोक माहीत असून सुद्धा हे पदार्थ आवडीने खातात.
रेड मीट
रेड मीटला नेहमीच कोलेस्ट्रॉलसाठी धोकादायक मानलं जातं. हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांना नेहमीच रेड मीट न खाण्याचा सल्ला दिला जातो. एक्सपर्ट सांगतात की, तुम्ही मांस खाणं पूर्णपणे टाळलं पाहिजे. प्रोटीनसाठी त्याऐवजी तुम्ही दुसरे पदार्थ खाऊ शकता.
प्रोसेस्ड मीट
एक्सपर्ट कोलेस्ट्रॉलच्या रूग्णांना प्रोसेस्ड फूड न खाण्याचाही सल्ला देतात. प्रोसेस्ड मीटमध्ये कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे समस्या अधिक वाढू शकते.
रक्तात कोलेस्ट्रॉल वाढवतात बेक्ड फूड
अनेक लोकांसाठी कुकीज आणि पेस्ट्री सर्वात स्वादिष्ट पदार्थ असतील. अनेकजण नाश्त्यात हे पदार्थ नियमितपणे खात असतील. एक्सपर्ट्सनी इशारा दिला आहे की, लोणी, शॉर्टिंग आणि शुगरचं अधिक प्रमाणात सेवन करणं मानवी शरीरासाठी चांगलं नाही. जर तुम्ही आधीच कोलेस्ट्रॉलचे रूग्ण असाल तर तुम्ही हे पदार्थ पूर्णपणे टाळले पाहिजे.
फ्राइड फूड
बऱ्याच लोकांना कुरकुरीत तळलेले पदार्थ खाणं खूप आवडतं. तज्ज्ञांनी तळलेल्या पदार्थांबाबत इशारा दिला आहे. एक्सपर्ट सांगतात की, डीप फ्राय केल्याने पदार्थातील उर्जा घनत्व आणि कॅलरीचं प्रमाण वाढतं. तज्ज्ञ पदार्थ तळण्यासाठी एअर फ्रायर किंवा चांगलं तेल वापरण्याचा सल्ला देतात.
(टिप - वरील लेख हा सामान्य माहितीवर आधारित आहे. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. याकडे कोणताही उपाय म्हणून बघू नका. काही समस्या असेल तर आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)