हॉर्वर्डच्या वैज्ञानिकांचा दावा, बटाटे अधिक खाल्ल्याने डायबिटीस, लठ्ठपणा आणि हृदयरोगाचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 12:54 PM2021-08-14T12:54:19+5:302021-08-14T12:54:41+5:30
वैज्ञानिक म्हणाले की, बटाट्यात कार्बोयहायड्रेट जास्त प्रमाणात असल्याने आरोग्याला जास्त नुकसान पोहोचतं.
भाज्यांचा राजा म्हटला जाणाऱ्या बटाट्याने ब्लड शुगर, हृदयरोग आणि लठ्ठपणा वाढण्याचा धोका आहे. असा दावा हॉर्वर्ड मेडिकल स्कूलच्या वैज्ञानिकांनी त्यांच्या नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये केला आहे. वैज्ञानिक म्हणाले की, बटाट्यात कार्बोयहायड्रेट जास्त प्रमाणात असल्याने आरोग्याला जास्त नुकसान पोहोचतं.
बटाट्याप्रमाणे जमिनीखाली उगवणाऱ्या भाजीतही अनेक प्रकारचे पोषक तत्व आढळतात. पण या सर्वांमध्ये कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असतं. वैज्ञानिक म्हणाले की, बटाट्यात कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असतं. जे सहजपणे पचतं. त्यामुळे शरीरात ब्लड शुगर वेगाने वाढतं आणि नंतर तेवढ्याच वेगाने घटतं. जे धोकादायक आहे.
बटाट्याने आरोग्याला नुकसान होण्याचं आणखी एक कारण आहे. जमिनीच्या आत उगणाऱ्या भाज्यांमध्ये कार्बोहायड्रेट जास्त असण्याचं कारण त्यांच्यात ग्लायसीमिक इंडेक्स जास्त प्रमाणात असतं. ग्लायसीमिक इंडेक्स जास्त असण्याचा अर्थ त्या भाज्यांमुळे किंवा फळांमुळे ब्लड शुगर वेगाने वाढतं. हे पदार्थ खाल्ल्यानंतर ब्लड शुगर वेगाने वाढू लागतं.
रिसर्चनुसार, असे पदार्थ खाल्ल्याने लवकर लवकर लवकर भूक लागते. मग माणूस पुन्हा पुन्हा खातो आणि प्रमाणापेक्षा जास्त खाण्याची सवय त्यांना लागते. जास्त काळ असे पदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणा, डायबिटीस आणि हृदयरोगांचा धोका वाढतो. वैज्ञानिक सांगतात की, अशात लठ्ठपणा सर्वात मोठी समस्या आहे.
बटाटे आणि आजार यातील कनेक्शन समजून घेण्यासाठी २० रिसर्च केले गेले. रिसर्च दरम्यान १ लाख २० हजार महिला आणि पुरूषांची लाइफस्टाईल व त्यांच्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवण्यात आलं. द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, समोर आलं फ्रेंच फ्राइज, बेक्ड आणि तळलेले बटाटे खाल्ल्याने लोकांचं वजन वाढलं.