मोठं यश! 'या' महिन्यात कोरोना विषाणूंची लस मिळणार; ३ देशात पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 11:02 AM2020-05-28T11:02:23+5:302020-05-28T11:12:22+5:30
कोरोनाची लस तयार करण्याचं काम वेगाने सुरू आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस जगभरात वाढत चालला आहे. कोरोना विषाणूंवर लस शोधली जाण्यासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. सध्या हार्वर्ड युनिव्हरसिटीतील तज्ञांनी दावा केला आहे की, कोरोनाची लस तयार करण्याचं काम वेगाने सुरू आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
त्यांनी असेही सांगितले की, येत्या काळात या लसीचे यशस्वी प्रयोग झाल्यास कोरोनाच्या उपचारांसाठी प्रभावी ठरू शकते. या लसीचे क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाल्यानंतर कोरोना विषाणूची लस तयार करण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही. राहूल गांधी यांच्यासोबत एका मुलाखतीदरम्यान यांनी याबाबत माहिती दिली आहे.
अमेरिका, चीन, ब्रिटेनमध्ये ट्रायल सुरू
कोरोना विषाणूंच्या लसीबाबत माहिती देताना हार्वर्ड युनिव्हरसिटीचे प्रमुख प्राध्यापक आशीष झा यांनी सांगितले की, कोरोना विषाणूंचे ट्रायल अमेरिका, चीन आणि ब्रिटेनमध्ये होत आहे. सुरूवातीला दिसून आलेले परिणाम समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या चाचणीत सकारात्मक परिणाम दिसून आल्यास २०२१प र्यंत लस तयार होऊ शकते. तज्ज्ञांना अशी आशा आहे की, २०२१ च्या सुरूवातील कोरोना विषाणूंना रोखण्यासाठी या लसीचा वापर केला जाऊ शकतो.
प्राध्यापक आशीष झा हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इंस्टिट्यूटचे डायरेक्टर आहेत. ही लस तयार होण्याची शक्यता असल्यामुळे भारतीयांनी देशाला वाचवण्यासाठी वॅक्सिनसाठी तयार राहण्याचे ही त्यांनी सांगितले. या लसीबाबत अधिक माहिती न देता सुरूवातीचे परिणाम पाहता लस यशस्वी होत असून २०२१ पर्यंत लोकांसाठी उपलब्ध असेल तर असे त्यांनी सांगितले.
निकोटीनमुळे फक्त फुफ्फुसांचा नाही तर ९ प्रकारच्या कॅन्सरचा असू शकतो धोका; असा करा बचाव
'या' डासांमधील बॅक्टेरियांमधून कोरोनाचा विषाणू होणार नष्ट; चीन आणि अमेरिकेतील तज्ज्ञांचा दावा